धक्कादायक! बाजारात भर दिवसा युवकाला घेरले अन्...

जमावाने रुग्णालयाच्या दार्शनिक भागाच्या काचा फोडल्या तसेच अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेची देखील तोडफोड केली.

अहमदनगरः कोपरगाव बाजारात भर दिवसा युवकाची 7 ते 8 जणांनी रॉडने मारहाण आणि दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. राजू भोसले (रा. शिंगणापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ५३वी स्थानबध्दतेची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळावर ही घटना घडली. राजू भोसले याला शहरातील श्री जनार्धन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे. आठवडी बाजार सुरू असताना राजू भोसले याच्यावर अचानक सात ते आठ तरुणी हल्ला केला. या टोळक्याने राजूला बेदम मारहाण केली. त्यानंतर रॉड, गजाने राजा भोसले जोरदार हल्ला चढवला. जखमी झाल्यामुळे तो जागेवरच कोसळला. त्यानंतरही आरोपींनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली. राजू भोसले मृत झाल्याचे समजून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकास पोलिस कोठडी...

स्थानिकांनी राजू भोसले यांना तातडीने जनार्दन स्वामी रुग्णालयात दाखल केले. पण त्याठिकाणी जमाव आक्रमक झाला होता. राजूचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच जमावाने रुग्णालयाच्या दार्शनिक भागाच्या काचा फोडल्या तसेच अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेची देखील तोडफोड केली. संतप्त नातेवाईक आणि मित्रांनी रस्ता अडवला. आरोपींना त्वरीत अटक करा, अशी मागणी नातेवाईकांनी केली.

शिरूर पोलिस स्टेशनची जबरदस्त कामगिरी...

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

...म्हणून शिक्रापूर पोलिस चार दिवस झोपलेच नाहीत!

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: ahmednagar crime news 7 to 8 people killed the youth togethe
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे