अग्निपथ योजना: हवाई दलाने शेअर केला सविस्तर तपशील...

अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या भरतीसाठी हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर विविध सुविधांबाबत तपशील जारी केला आहे.

नवी दिल्ली: अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या भरतीसाठी हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर विविध सुविधांबाबत तपशील जारी केला आहे. चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनुसार असतील. पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात.

जम्मू काश्मीरमध्ये 12 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; जैशचा कमांडर ठार

अग्निवीरांना सेवा कालावधीत प्रवास भत्ताही मिळेल. याशिवाय त्यांना वर्षातून ३० दिवसांची रजा मिळणार आहे. त्यांच्यासाठी वैद्यकीय रजेची व्यवस्था वेगळी आहे. अग्निवीरांना सीएसडी कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहे. सेवेदरम्यान (चार वर्षे) दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.

वायुसेना कायदा 1950 अंतर्गत त्यांची हवाई दलात भरती 4 वर्षांसाठी असेल असं हवाई दलाने म्हटले आहे. हवाई दलात अग्निवीरांची वेगळी रँक असेल, जी सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असेल. अग्निपथ योजनेच्या सर्व अटींचे अग्निवीरांना पालन करावे लागेल. वायुसेनेत नियुक्तीच्या वेळी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अग्निवीरांना त्यांच्या पालकांची स्वाक्षरी असलेले नियुक्ती पत्र घ्यावे लागेल. चार वर्षांच्या सेवेनंतर 25 टक्के अग्निवीरांना नियमित केडरमध्ये घेतले जाईल. या २५ टक्के अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवा कालावधीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. वायुसेनेनुसार अग्निवीर हा सन्मान आणि पुरस्काराचा हक्कदार असेल. वायुसेनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निवीरांना सन्मान आणि पुरस्कार दिले जातील. हवाई दलात भरती झाल्यानंतर अग्निवीरांना लष्कराच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सलाम! 15000 फूट उंचीवर -40 डिग्रीत जवानांनी फडकवला तिरंगा...

अग्निपथ योजनेची वैशिष्ट्ये
>> अग्निपथ योजनेच्या भरतीसाठी 17 ते 21 ची वयोमर्यादा आहे
>> इच्छूक उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास हवा
>> ही भरती चार वर्षांसाठी असेल
>> चार वर्षाच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होईल
>> भरती झालेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतलं जाणार

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा... अथवा बुकगंगा या वेबसाईटवर जाऊन खरेदी करा.

जवान चंदू चव्हाण

Title: Agnipath Scheme indian air force releases details on agnipat
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे