Video: १५ बायका १०७ मुले; लग्न करतच राहणार...

जगातील सर्वांत मोठ्या कुटुंबांपैकी एका कुटुंबाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केनिया: जगातील सर्वांत मोठ्या कुटुंबांपैकी एका कुटुंबाचा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेव्हिड साकायो कालुहाना (वय ६१) नावाच्या आफ्रिकन व्यक्तीला 15 बायका आणि 107 मुले आहेत. पश्चिम केनियातील एका गावात हे कुटुंब एकत्रित राहात आहेत.

डेव्हिड हे एक इतिहासकार आहेत. सर्व बायका आपापली कामे वाटून घेतात आणि एकमेकांबरोबर आनंदाने राहतात, असे डेव्हिड यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. पहिल्या पत्नीचे नाव जेसिका कालुहाना आहे. तिला 13 मुले आहेत. ती सांगते, 'नवऱयाने नवीन बायको घरी आणल्याबद्दल मला कधीही ईर्ष्या वाटली नाही. ते पती म्हणून जबाबदार व्यक्ती आहेत. ते जे करतात, ते नेहमीच बरोबर असते.' आमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने राहत आहे, असे डेव्हिड यांची सातवी पत्नी रोझ कालुहाना यांनी सांगितले.

अधिक महिलांशी लग्न करण्याविषयी डेव्हिड म्हणाले की, 'मी राजा सॉलोमनकडून प्रेरणा घेत आहे. राजा सॉलोमन यांना 1000 बायका होत्या. मी स्वत:ला सॉलोमनपेक्षा कमी समजत नाही, म्हणूनच अधिकाधिक महिलांशी लग्न करेन आणि त्यांना पत्नी करून घेईन.' दरम्यान, संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून, नेटिझन्सही मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

दोन मैत्रिणींनी एकाच युवकासोबत केलं लग्न; कारण...

प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...

आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...

कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

Title: african man lives in village with 15 man and 107 children wa
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे