आफगाणिस्तानमधील पत्रकाराला मारल्याबाबत नवीन खुलासा...

तालिबानने यापूर्वी भारताचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या केली होती.

काबूल (अफगाणिस्तान): तालिबानने आणखी एका पत्रकाराची हत्या केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिली होते. पण, हत्या झाल्याचे वृत्त केवळ अफवा असल्याचे समोर येत आहे. जियार याद या पत्रकाराने स्वतः ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या

तालिबानने यापूर्वी भारताचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या केली होती. याआधी TOLO NEWS ने दिलेल्या वृत्तानुसार, 'जियार याद असे हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. जियार आणि त्यांच्या कॅमेरामनला तालिबानच्या दहशतवाद्यांनी मारहाण केली. या घटनेदरम्यान दोघेही अफगाणी नागरिकांच्या गरिबी आणि बेरोजगारीवर रिपोर्टिंग करत होते. तालिबानने जियार याद यांचा फोन आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत. कॅमेराही तोडून टाकला आहे.'

जियार याद यांच्या हत्येचे वृत्त समजताच जियार यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन हत्येचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, 'अचानक माझ्यावर हल्ला का केला हे मला अजूनही माहित नाही. ते असे का वागले हे देखील माहित नाही. ही घटना तालिबान नेत्यांसोबत शेअर करण्यात आली आहे. तथापि, गुन्हेगारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गंभीर धोका आहे.'

त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विटमध्ये लिहिले की, 'काबूलच्या न्यू सिटीमध्ये तालिबान्यांनी मला मारहाण केली होती. कॅमेरे, तांत्रिक उपकरणे आणि माझा वैयक्तिक मोबाईल फोन देखील हायजॅक केला आहे. काही लोकांनी माझ्या मृत्यूची बातमी पसरवली आहे. पण, ती खोटी आहे.

क्रूरता! काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार, रस्त्यावर रक्ताचा सडा...

तालिबानने अपहरण केलेले भारतीय सुखरूप...​

अफगाणिस्तान मधील हा फोटो नाहीच; जाणून घ्या सत्य...

Live Video: काबूल विमानतळावर गोळीबारानंतर मोठा गोंधळ...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: afghanistan crisis tolo news reporter ziar yaad was not kill
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे