होय! हाच तो आत्मघातकी दहशतवादी...

दहशतवाद्याने तोंडावर काळे कापड गुंडाळलेले असून, छातीवर बंदूक लावलेली दिसत आहे. त्याच्यापाशी विस्फोटक बेल्टदेखील दिसतो आहे.

काबुल (अफगाणिस्तान): काबूलमधील हामिद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटात 13 अमेरिकी सैनिकांसह 105 जण मारले गेले. इसीस या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. या संघटनेने हा स्फोट घडवणाऱ्या दोन आत्मघातकी बॉम्बरपैकी एकाचा फोटो जाहीर केला आहे.  अब्दुल रहमान अल-लोगरी असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

आफगाणिस्तानमधील पत्रकाराला मारल्याबाबत नवीन खुलासा...

दहशतवाद्याने तोंडावर काळे कापड गुंडाळलेले असून, छातीवर बंदूक लावलेली दिसत आहे. त्याच्यापाशी विस्फोटक बेल्टदेखील दिसतो आहे. इस्लामिक स्टेटच्या झेंड्यापुढे तो उभा असून, त्याचे केवळ डोळे या फोटोमध्ये दिसत आहेत. दुसऱ्या दहशतवाद्याचा फोटो जाहीर केलेला नाही. अमेरिकी सैनिकांना टार्गेट करणे, हाच या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश होता. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सध्या अमेरिकेच्या ताब्यात असणारे एकमेव विमानतळ आहे.

क्रूरता! काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार, रस्त्यावर रक्ताचा सडा...

दरम्यान, अफगाणिस्तानमधील एकूण 4 आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी 3 विमानतळांवर अगोदरच तालिबानने ताबा मिळवला आहे. या विमानतळावर तैनात असणारे अमेरिकी सैनिक नागरिकांचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे तपासून त्यांना आत सोडण्याच्या तयारीत होते. हा दहशतवादी अमेरिकी सैनिकांच्या अधिकाधिक जवळ येण्याच्या प्रयत्नात होता. विमानतळाबाहेरच्या गर्दीत या हल्लेखोराला कुणीही अटकाव केला नाही.

भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या

त्यामुळे तो अमेरिकी सैनिकांपासून 5 मीटर अंतरावर पोहोचला. तिथे त्याने बॉम्बस्फोट केला आणि 105 जणांचे प्राण गेले. अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भावूक झाले होते. हल्लेखोरांना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तालिबानने अपहरण केलेले भारतीय सुखरूप...​

अफगाणिस्तान मधील हा फोटो नाहीच; जाणून घ्या सत्य...

Live Video: काबूल विमानतळावर गोळीबारानंतर मोठा गोंधळ...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: afghanistan crime news kabul internation airport blast isis
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे