फेसबुकवर स्वस्तात दुचाकी विकण्याची जाहिरात दिली अन्...

फेसबुकवर स्वस्तात दुचाकी विकण्याची जाहिरात देऊन एका व्यक्तीची ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.

पुणे: फेसबुकवर स्वस्तात दुचाकी विकण्याची जाहिरात देऊन एका व्यक्तीची ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आरोपीने २७ हजार रुपये खात्यातून परस्पर काढून घेतले आहेत.

अजब प्रेम की गजब कहानी; लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन्...

या प्रकरणी वानवडी येथील नानावटी नगरमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जोरा सिंह नावाचे फेसबुक प्रोफाइल असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी पडले प्रेमात अन् केला विवाह...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याच्या प्रोफाइलवरून फेसबुकवर दुचाकी स्वस्तात विकण्यासंदर्भातील जाहिरात पोस्ट केली होती; तसेच तो स्वत: लष्करात नोकरीस असल्याचे त्यात नमूद केले होते. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादित केला.

प्रेमीयुगलाने लॉकडाऊनमुळे हाल होत असल्याचे पोलिसांना सांगितले अन्...

 त्यानंतर फिर्यादीने दुचाकी खरेदीसाठी प्रतिसाद दिला. तेव्हा आरोपीने फिर्यादीला 'गुगल पे' द्वारे ३००१ रुपये पाठविण्यास सांगितले आणि नंतर त्यांच्या खात्यातून २७ हजार ७२० रुपये ऑटोडेबिट झाले. मात्र, आरोपीकडून फिर्यादीला दुचाकी देण्यासंदर्भातील कार्यवाही झाली नाही. त्यामुळे फिर्यादीची एकूण ३० हजार ७२१ रुपयांची फसवणूक झाली. त्याबाबत फिर्यादीने पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Advertised to sell cheap bikes on Facebook and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे