प्रसिद्ध अभिनेत्रीला व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून बसला धक्का...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर धक्काच बसला. माझ्या एका मैत्रीणीने मला या व्हिडिओबाबत माहिती दिली.

मुंबई: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राम्या सुरेश हिचा एक मॉर्फ पॉर्न व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओविरोधात अभिनेत्रीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

बलात्कार प्रकरणी अभिनेत्री कंगनाच्या बॉडीगार्डला अटक

अद्यायावत तंत्रज्ञानामुळे फिल्म मेकिंग क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. तेच दृश्य आज व्हिडीओ एडिटिंग, क्रोमा की, स्पेशल इफेक्ट यांसारख्या टूल्समुळे घरबसल्या करता येऊ शकते. पण, त्याचे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. अनेक नामांकित अभिनेत्रींचे मॉर्फ व्हिडिओ किंवा छायाचित्र तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्फ म्हणजे एखाद्या फोटोवर किंवा व्हिडिओमधील व्यक्तीवर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा चेहरा लावणे. हा चेहरा इतक्या चपखलपणे लावला जातो की दृश्यामधील व्यक्ती तोच आहे की अन्य कोणी हे ओळखणे देखील कठीण जाते.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल; पोलीस घेतायेत निर्मात्याचा शोध

अभिनेत्रीच्या चेहऱ्यांचा वापर सध्या पॉर्न व्हिडीओ तयार करण्यासाठी केला जात आहे. अन् या यादीत आता राम्या सुरेश हिचे देखील नाव जोडले गेले आहे. तिचा देखील एक मॉर्फ व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हिडीओ विरोधात तिने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या या व्हिडीओची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

राम्या म्हणाली, 'संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर धक्काच बसला. माझ्या एका मैत्रीणीने मला या व्हिडिओबाबत माहिती दिली. हा व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडावे अशी विनंती मी पोलिसांना केली आहे.' पोलिस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: actresss remya suresh morphed video goes viral police compla
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे