धक्कादायक! मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या...

अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी मुलाचे अपहरण केले मात्र त्याने विरोध केल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला व मृत्यदेह इमारतीवर नेऊन टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली.

नाशिक : मालेगाव शहरातील नवा आझादनगर भागातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेने मालेगाव शहर हादरलं होतं. अखेर नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या दोन आठवड्यानंतर खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी पडले प्रेमात अन् केला विवाह...

अरसलान शेख सलिम हा 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा 22 मे रोजी नवा आझादनगर भागातून बेपत्ता झाला होता. दोन दिवसानंतर अरसलानचा मृतदेह जाफरनगर येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर संशयास्पदरित्या सापडला होता. आपल्या मुलाचा घातपात करण्यात आल्याचा कुटुंबियांना संशय होता. तसा संशय त्यांनी पोलिसांजवळ व्यक्त केला होता.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात अऩ्...

आझाद नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली असता संशयित फैजाण अखतर या 20 वर्षीय तरुणाला पहिल्यांदा पोलिसांनी ताब्यात घेतलं. नंतर त्याची चौकशी सुरु केली असता अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी मुलाचे अपहरण केले मात्र त्याने विरोध केल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला व मृत्यदेह इमारतीवर नेऊन टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

प्रेमीयुगलाने लॉकडाऊनमुळे हाल होत असल्याचे पोलिसांना सांगितले अन्...

कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार संशयितास ताब्यात घेण्यात आले. पुढे पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून एक एक प्रश्नांची उत्तरे घेण्यात आली. अखेर अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी मुलाचे अपहरण केले मात्र त्याने विरोध केल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला व मृत्यदेह इमारतीवर नेऊन टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Accused confesses to abducting and killing a minor in Malega
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे