साप्ताहिक राशीभविष्य...
06 जुलै ते 12 जुलै 2020
जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरदारांना नवीन कल्पना आत्मसात करता येतील. नोकरीत असणाऱ्यांची अडचणीतून सुटका होईल. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील.मेष : आर्थिक अडचणी कमी होईल
जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरदारांना नवीन कल्पना आत्मसात करता येतील. नोकरीत असणाऱ्यांची अडचणीतून सुटका होईल. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील. अनेक अडचणींतून सुटका झाल्याचे समाधान मिळेल. आर्थिक अडचणी कमी होईल. वैयक्तिक खर्चावर मात्र लगाम घाला. राजकीय खटाटोप मात्र बदलणारा असेल. नातेवाईकांशी होणाऱ्या संवादातून बदल घडेल. धार्मिक गोष्टीत मन रममाण होईल. आरोग्य उत्तम साथ देईल.
वृषभ : आरोग्याकडे लक्ष द्या
सरकारी नोकरदार व्यक्तींना थोडी विश्रांती मिळणार आहे. जास्त वेळ द्यावा लागत होता, तो कमी होईल. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संशोधन यश मिळवून देईल. आध्यात्मिक प्रगती उत्तम राहील. धनाविषयीची काळजी कमी होईल. हातचे राखून ठेवण्याची सवय उत्तम असेल. सामाजिक क्षेत्रात आघाडीवर पोहोचाल मैत्रीच्या नात्यांमध्ये स्पष्टपणाचे वक्तव्य राहील. शारीरिकदृष्टय़ा आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करणे टाळा.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय विचाराने घ्या
नोकरीतील तांत्रिक अडथळे तुम्हाला दूर करावे लागतील. मोठे व महत्त्वाचे निर्णय विचाराने घ्या. पण, घाईने निर्णय घेणे टाळा. नियोजित वेळेत काम करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक आवक उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात स्वतहून हस्तक्षेप करणे टाळा. वैवाहिकदृष्टय़ा समतोल राखण्याचा प्रयत्न असू द्या. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. आरोग्यावरील ताण-तणाव कमी करा.
कर्क : अफवांवर विश्वास ठेवू नका
नोकरीबाबत झालेला गैरसमज दूर करा. इतरांवर विश्वास ठेवून पाऊल उचलू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. अतिरिक्त गुंतवणूक टाळा. आर्थिक संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक घडी विस्कळीत होणार नाही याकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्रातील गैरसमज टाळा. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक द्विधा अवस्था बदलण्याचा विचार करा. आध्यात्मिक राहून मनाची एकाग्रता वाढवा. शारीरिकदृष्टय़ा मात्र व्यायामाला महत्त्व द्या.
सिंह : मानसिक मनोबल वाढवा
नोकरदार व्यक्तींना स्वत: काही निर्णय घेता येणार नाही. निर्णय घेण्याची व आत्मसात करण्याची वेळ आलेली नाही. सध्या जे आहे तेच स्वीकारून पुढे जा. परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊन राहावे लागेल. फायद्या-तोटय़ाचा हिशोब आधीच केला तर बरेचसे नुकसान टळेल. आर्थिक आवक बघून मगच खर्च करा. मैत्रीचे नाते घट्ट करण्याचा प्रयत्न असेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक मनोबल वाढवा व प्रकृतीचे स्वास्थ्य बिघडू देऊ नका.
कन्या : सार्वजनिक कामात यश मिळेल
नोकरीतील अधिकारपदाची जबाबदारी पार पाडावी लागेल. अधिकारी वर्ग तुमच्या कौशल्याला दाद देईल. कोणाचाही विरोध तुमच्या पदासाठी नसणार. आर्थिक बाबतीत समाधानकारक परिस्थिती असेल. सामाजिक परिवर्तन घडून येईल. सार्वजनिक कामात यश मिळेल. ही समाधानकारक गोष्ट मनाचा उत्साह वाढवणारी आहे. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराच्या बोलण्यात सडेतोडपणा असेल. प्रकृती उत्तम राहील.
तूळ : परिश्रम सोडून चालणार नाही
नोकरदार व्यक्तींना परिश्रम सोडून चालणार नाही. मनाची चलबिचल अवस्था प्रथम स्थिर करा. तरच नोकरीत स्वास्थ्य लाभेल. आपले काम हेच आपले यश अशी ठाम वृत्ती ठेवा. तुमच्या उत्पादनाला मागणी वाढेल. त्यामुळे अचानक उत्पादन वाढवावे लागणार आहे. मोठय़ा व्यवहारांनासुद्धा कलाटणी मिळणार आहे. मागणी तसा पुरवठा केल्याने आपोआपच व्यवसायात वाढ होईल. पैशांचे नियोजन उत्तम होईल. मुलांसाठी काही वेळ तुम्हाला राखून ठेवावा लागेल. प्रकृतीचे स्वास्थ्य बिघडणार नाही, उत्तम राहील.
वृश्चिक : तुमचे कौतुक केले जाईल
नोकरदारांना मोठा सहयोग मिळणार आहे. परिश्रमाचे मोल मिळेल. तुलनात्मक गोष्टींचा विचार करता शुभत्व वाढवणारे आहे. व्यवसायांतील ठराव मंजूर होतील. धनाचा प्रश्न समाधान वाढवणारा आहे. आर्थिक काळजी घेतल्याने स्थिर अवस्था निर्माण होईल. कुटुंबातील कर्त्यां व्यक्तीकडून तुमचे कौतुक केले जाईल. मुलांचे प्रश्न कमी होतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. शारीरिकदृष्टय़ा आरोग्य ठणठणीत राहील.
धनू : रागाचा वेग कमी करा
नोकरीचा नवीन कल मार्गी लागेल. त्यासाठी ज्येष्ठांची मदत घ्यावी लागेल. नोकरदारांना जुन्या कामाचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. पोलिस, अधीक्षक या व्यक्तींच्या कामकाजात वाढ होईल. रागाचा वेग कमी करा. आर्थिक कोंडी हळूहळू कमी होईल. राजकीय क्षेत्रात दोन शब्द कमीच बोला. नातेवाईकांशी चर्चा करताना समजुतीने घ्यावे लागेल. घरगुती वाद चव्हाटय़ावर आणू नका. आरोग्य उत्तम राहील.
मकर : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
नोकरी करणे तुमच्यासाठी तारेवरची कसरत आहे, असा नकारार्थी विचार दूर करा. कष्टाचे फळ उशिरा का होईना मिळेल. स्वतचे बजेट पाहून प्रश्न सोडवा. सामाजिक क्षेत्रांतील हालचाली बदलतील. शेजारी व नातलग यांच्या कोणत्याही वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. कौटुंबिक बाबतीत मात्र तुमची जबाबदारी योग्य पार पाडाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ : आर्थिक संकल्पना पूर्ण होतील
नोकरीचे वाढते कामकाज करताना कामाचा आराखडा प्रथम ठरवून घ्या. काम करतेवेळी चिकित्सक राहा. आर्थिक संकल्पना पूर्ण होतील. सामाजिक कल उंचावणारा असेल. मैत्रीच्या भावनेने केलेले व्यवहार पचनी पडतील. मैत्रीचा प्रतिसाद तुमचा उत्साह वाढवणारा आहे. घरांतील ज्येष्ठ व्यक्तींना प्रतिउत्तर करू नका. आध्यात्मिक गोष्टींचा मानसिकदृष्टय़ा आधार वाटेल. प्रकृतीचे स्वास्थ्य जपा.
मीन : वैवाहिक मतभेद दूर ठेवा
नोकरदार व्यक्तींना अधिकार प्राप्त होईल. त्यासाठी वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर असेल. याच गोष्टींसाठी तुम्ही धडपड करीत होता. ती आता पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल. घरगुती व्यावसायिकांना पर्यायी गोष्टींचा आधार घ्यावा लागेल. पैशांची चणचण भासणार नाही. मैत्रीच्या नात्यांत दुरावा येऊ देऊ नका. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक मतभेद दूर ठेवा. शारीरिक प्रकृतीकडे लक्ष द्या.