साप्ताहिक राशीभविष्य...

20 ते 26 जुलै 2020

नवी मैत्रीण, नवी ओळख टाळण्याचा प्रयत्न करा. नातेवाईक व शेजारी यांच्याशी वादविवादाचे प्रसंग टाळा. कुटुंबातील कलह कमी करून योग्य बदल घडवा.

मेष : आर्थिक कोंडी कमी होईल
नोकरदार व्यक्तींनी कामाकडे लक्ष केंद्रित करावे. मनातील विचार काम सुचू देणारे नाही. कामाव्यतिरिक्त विचार करणे टाळा. दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. आर्थिक कोंडी कमी होईल. खर्च सांभाळणे उत्तम जमेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. तुमच्यावर असणारी कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. ध्यानधारणा व योगासनात मन गुंतवा. मानसिक कणखरपणा वाढवा. आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृषभ : नवी मैत्रीण, नवी ओळख टाळण्याचा प्रयत्न करा
नोकरदारांना नोकरीतील कामाचा अंदाज येणार नाही. दडपणाखालील कामाचे स्वरूप बदलेल. ठरवून ठेवलेल्या व्यवसायात बदल होतील. इतरांच्या बरोबरीने व्यवसाय करू नका. कोणतीही न जमणारी जबाबदारी घेऊ नका. अडचणीतून मार्ग काढा. आर्थिक संकोच बाळगू नका. मागे केलेल्या बचतीचा उपयोग होईल. नवी मैत्रीण, नवी ओळख टाळण्याचा प्रयत्न करा. नातेवाईक व शेजारी यांच्याशी वादविवादाचे प्रसंग टाळा. कुटुंबातील कलह कमी करून योग्य बदल घडवा.

मिथुन : आर्थिक संकल्पना पूर्ण होतील
नोकरीतील प्रसंग कमी होईल. तुमच्या बौद्धिक कौशल्याचे कौतुक होईल. तुमची जिद्द व प्रयत्न यश मिळवून देईल. प्रलंबित कामांना वेग येईल. आर्थिक हिशोबाचा ताळमेळ उत्तम साधता येईल. समाधानकारक आर्थिक संकल्पना पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कारकीर्दीला उत्तम प्रतिसाद मिळेल. नातेवाईकांशी सुसंवाद घडेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. शारीरिकदृष्टय़ा होणारी दगदग कमी होईल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : आर्थिक लाभ चांगले राहतील
नोकरदारांना सतर्क राहून काम करावे लागेल. बेकायदेशीर गोष्टींना हात घालू नका. उत्पन्नाची गरज लक्षात घ्या. आर्थिक लाभ चांगले राहतील. अनावश्यक खर्चावर मात्र आळा घाला. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा आदर करा. भावंडांविषयीची गोड बातमी कानावर येईल. त्याचा आनंद निर्माण होईल. कुटुंबात एकीचे वातावरण असेल. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच स्वत:चे आरोग्यही जपा.

सिंह : मैत्रीच्या नात्यात सुखद क्षण अनुभवाल
नोकरदार वर्गाने आगामी गरजा लक्षात घ्या. तुमच्या प्रात्यक्षिक कामाचा बोजवारा कमी होईल. विचार टाळा, काही कमावणे यापेक्षा काही न गमावणे याकडे लक्ष द्या. मोठे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल, तर थोडे थांबावे लागेल. दुसऱ्याने दिलेले व्यावसायिक सल्ले टाळा. आर्थिक वाटचाल टप्प्याटप्प्याने चालू राहील. मैत्रीच्या नात्यात सुखद क्षण अनुभवाल. घरगुती वातावरण उत्साही राहील, याकडे लक्ष द्या. प्रकृती ठीक राहील.

कन्या : धनाचा प्रश्न हळूहळू मिटू लागेल
शासकीय कर्मचारी वर्गाचा वरिष्ठांशी असलेला कलह कमी होईल. कष्टाचे प्रमाण वाढेल. किरकोळ असणाऱ्या कुरबुरीकडे लक्ष देऊ नका. धनाचा प्रश्न हळूहळू मिटू लागेल. त्यासाठी तुमची बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. खर्च मोजून-मापून करा. सामाजिक कल उंचावता राहील. मित्रांवर अतिविश्वास टाकणे टाळा. मुलांना असणारी अडचण लक्षात घ्या व वेळीच मुलांचे प्रश्न हाताळा. जोडीदाराशी सुसंवाद साधताना वादाचा प्रसंग टाळा. प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्या.

तूळ : मैत्रीचे नाते घट्ट होईल
नोकरीचे स्वास्थ्य उत्तम ठेवा. सतत प्रयत्नशील राहून आडवळणी मार्ग कमी करा. दुसऱ्याशी तुलना करून मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका. व्यावसायिक चढ-उतार  स्वीकारून काम करत राहा. कष्टाचा मोबदला चांगला मिळेल. लाभाचे प्रमाण चांगले राहील. मैत्रीचे नाते घट्ट होईल. नातेवाईकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. मानसिक चंचलता कमी करा. प्रकृती उत्तम राहील.

वृश्चिक : आर्थिक विवंचना कमी होईल
नोकरदार व्यक्तींची भावनिकता वाढवणारा आठवडा आहे. कामात गती निर्माण होईल. गैरसोयीची परिस्थिती हळूहळू कमी होईल. आर्थिक विवंचना कमी होईल. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास अडचणीचा प्रश्न निर्माण होणार नाही. कामापुरते जवळ येणाऱ्या मित्रांपासून लांब राहा. कुटुंबासमवेत वेळ घालवा. आध्यात्मिक आवड राहील. संतुलित आहार घ्या व आरोग्य जपा.

धनू : आर्थिक व्यवहार रोखीने करा.
नोकरदार व्यक्तींनी कामाचा जास्त तणाव घेऊ नका. कामाचे संतुलन बिघडू देऊ नका. परिपूर्ण नियोजन तणावमुक्त करणारे ठरेल. आर्थिक व्यवहार रोखीने करा. उधारीचे व्यवहार टाळा व राजकीय क्षेत्रात वरिष्ठांच्यात हस्तक्षेप करू नका. नातेवाईकांशी आनंदाने हितगुज कराल. कुटुंबातील वृद्धांची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा.

मकर : आवश्यक गरजेनुसार खर्च करा
नोकरदार व्यक्तींना वेगवेगळ्या स्तरांवर काम करावे लागेल.  रोजचे काम आता बदलत्या स्वरूपाचे असेल. आवश्यक गरजेनुसार खर्च करा. आर्थिक बाबतीत काळजी करणे टाळा. योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न असू द्या. सामाजिक स्तरावर सध्या मन रमणार नाही.  कौटुंबिक अडचणीवर मात करा. सकस आहार घ्या व आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ : मैत्रीचे नाते दृढ होईल व स्नेह वाढेल
नोकरीतील अवघड गोष्टी सोप्या करा. दर वेळी मानसिक त्रास वाढवून विचार करणे टाळा. कर्जाची परतफेड टप्प्याटप्प्याने करत राहा. आवक पाहून खर्च करा. सर्वागीण विकासाचा विचार करताना मागील त्रुटींचा विचार प्रथम करा. मैत्रीचे नाते दृढ होईल व स्नेह वाढेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फटकून बोलणे टाळा. मनाची एकाग्रता वाढवा. आरोग्याची प्रतिकारशक्ती वाढवा .

मीन : धनाचा प्रश्न मार्गी लागेल
नोकरदारांना चांगले दिवस पाहावयास मिळतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नोकरीत वाट पाहत असलेली संधी मिळण्याचे शुभ संकेत मिळतील. धनाचा प्रश्न मार्गी लागेल. मैत्रीच्या भावनेत केलेली मदत फलद्रूप ठरेल. मुलांचे कोडकौतुक कराल,  पण शिस्तबद्ध वागणूक बदलू देऊ नका. घरगुती वातावरणाची अनुकूलता वाढेल. मातृ सौख्य उत्तम राहील. प्रकृती जपा.

Title: 20 to 26 july weekly horoscope policekaka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे