साप्ताहिक राशीभविष्य...
नोकरीतील अंतर्गत बाबी समजून घ्याव्या लागतील. तुमचे ध्येय साध्य होईल. त्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. वरिष्ठांचे तडकाफडकी बोलणे असले तरी प्रत्युत्तर करू नका.मेष : वरिष्ठांची मदत घ्या
नोकरीतील अंतर्गत बाबी समजून घ्याव्या लागतील. तुमचे ध्येय साध्य होईल. त्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. वरिष्ठांचे तडकाफडकी बोलणे असले तरी प्रत्युत्तर करू नका. त्यातूनच तुमची प्रगती साध्य होईल. आवश्यक गरजेपुरता पैसा उपलब्ध होईल. सध्या गरज आहे एवढीच अपेक्षा ठेवा. सामाजिक क्षेत्रात मदत करताना नि:स्वार्थी भावना राहील. कौटुंबिक वातावरण बदल घडवणारे आहे. शारीरिक बाबतीत तंदुरुस्त राहाल.
वृषभ : पैशांची देवाणघेवाण टाळा
नोकरीतील कर्मचारी वर्गाने सहनशीलता वाढवावी. तुमच्या आवाक्याबाहेर असलेली परिस्थिती सांभाळून घ्यावी लागेल. ती सांभाळताना चिडचिड होऊ देऊ नका. तुमचे काम तुम्ही करत राहा. आर्थिक बाबतीत मात्र व्यावहारिक राहा. पैशांची देवाणघेवाण सध्या तरी टाळा. खर्चाचे ताळतंत्र बिघडू देऊ नका. सार्वजनिक क्षेत्रातील समतोल राखण्याचा प्रयत्न करा. धार्मिकता जपाल. प्रकृती उत्तम राखण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील
नोकरीचा ताळमेळ साधणे सहज शक्य होईल. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन वेळोवेळी घ्यावे लागेल. त्यांचे अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. लष्करी अधिकारी, रसायन शास्त्रज्ञ, अग्निशामक खात्यातील लोक यांना अनुकूलता राहील. पैशांचे नियोजन करताना खर्चाचा भार जास्त करू नका. मैत्रीच्या नात्यातील दुरावा वाढवू नका. आध्यात्मिक, मानसिक समाधान लाभेल. घरगुती जबाबदारीबरोबर स्वत:ची काळजी घ्या.
कर्क : आर्थिक गरजा पूर्ण होतील
नोकरदार वर्गालासुद्धा बदलत्या कार्यपद्धतीतून जावे लागेल. ही कार्यपद्धत कायमस्वरूपी नसल्याने मनावरील तणाव कमी होईल. बऱ्याच अवधीनंतर मिळणारी संधी सोडू नका. आर्थिक गरजा पूर्ण होतील. सार्वजनिक क्षेत्रातील कार्यपद्धती बदलून जाईल. मित्रांकडून मदत मिळेल. नातेवाईकांविषयीची असलेली चलबिचलता कमी करा. धार्मिक बाबतीत धरसोड वृत्ती ठेवू नका. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : कौटुंबिक कलह वाढवू नका
नवीन नोकरीचे प्रस्ताव तुमच्यापुढे असतील. असा प्रस्ताव नाकारू नका. मिळालेली नोकरी उत्तम प्रगती करा. वरिष्ठांची कृपा राहील. आर्थिक बाबतीत समाधानी असाल. अपेक्षित फलप्राप्ती झाल्याने उत्साह वाढेल. राजकारणातील संघर्षांचा काळ कमी होईल. तुमचे विचार इतरांवर प्रभाव पाडणारे असतील. कौटुंबिक कलह वाढवू नका. शारीरिक आजारपणे दूर होतील व आरोग्य उत्तम राहील.
कन्या : पैशाचा योग्य वापर करा
नोकरदारांनी ठोस पाऊल उचलताना योग्य ती काळजी घ्या. ठरवलेले नियोजन पूर्ण करा. त्यासाठी लागणारा कालावधी वाढवून घ्यावा लागेल. तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागेल. मिळालेल्या पैशाचा योग्य वापर करा. कौटुंबिकबाबतीत मात्र कुटुंबाची काळजी घ्या. वयोवृद्ध व्यक्तींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच काळजी घेणे हिताचे राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य जपा.
तूळ : नोकरीतील घडी बिघडू देऊ नका
उधारीचे व्यवहार करू नका. नोकरीतील घडी बिघडू देऊ नका. तुमचे स्वतचे मत तयार करू नका. काही बदल करावयाचे झाले तर वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. तुमचे काम तुम्ही स्वत करा. आर्थिक अडचणीवर मात करायला शिका. परिस्थितीनुसार खर्चाचे नियोजन करा. स्वतचे स्वहित जपा. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा.
वृश्चिक : चिडचिड कमी करा
नोकरदार वर्गाने माहिती नसलेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा. सुधारित बाजूंचा विचार करा. चिडचिड कमी करा. अनावश्यक खर्च टाळा. बचत करण्याकडे कल असूद्या. जुन्या मत्रीला उजाळा मिळेल. सासुरवाडीकडील नात्यात दुरावा येऊ देऊ नका. जोडीदाराला तुमच्या आधाराची गरज राहील. मानसिक त्रासाचे पाठबळ स्वतहून वाढवू नका.
धनू : वेळेत काम पूर्ण करावे लागेल
नोकरदार व्यक्तींना कामाच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करावे लागेल. त्यासाठी लागणारे मनाचे पाठबळ वाढवा. पैशांचा प्रश्न सुटू लागेल. फार मोठी बचत नाही, पण, आवश्यक गरज पूर्ण होणार आहे. सामाजिक क्षेत्रात असलेली तुमची धडाडी कमी होईल. मित्रांकडून घेतलेली मदत विसरू नका. मुलांसाठी वेळ देणे शक्य होईल. प्रकृतीची साथ उत्तम राहील.
मकर : कर्तव्य पार पाडाल
नोकरदारांना एकाच कामात न गुंतता इतर कामातसुद्धा लक्ष घालावे लागेल. अधिकारी वर्ग तुम्हाला कामाचे नियोजन ठरवून देतील. आर्थिक सांगड घालणे आता अवघड होणार नाही. घरगुती प्रश्नांचा भार हलका होईल व तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडाल. आध्यात्मिक गोष्टीत राहून मनाची एकाग्रता वाढवा. शारीरिकदृष्टय़ा असणारा त्रास कमी होईल.
कुंभ : कामाचे कौतुक होईल
नोकरीतील नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरतील. नोकरीतील बढतीचे योग उत्तम राहतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. तुमचे मानसिक स्थर्य उत्तम राहील. आर्थिकबाबतीत बचतीत वाढ होईल. कौटुंबिक वातावरण छान राहील. जोडीदारासमवेत वेळ घालवणे शक्य होईल. मानसिक द्विधा मन:स्थितीतून बाहेर पडाल. शारीरिकदृष्टय़ा प्रकृतीचे स्वास्थ्य उत्तम ठेवा.
मीन : तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल
नोकरीतील संघर्ष कमी होईल. नवीन बौद्धिक कौशल्य प्रगतिपथावर राहील. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल. याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर राहील. आर्थिक संकट कमी होईल, तरीही अचानक खर्चाची तरतूद करावी लागेल. नातेवाईकांकडून आनंदाची वार्ता कानावर येईल. कौटुंबिक सुखाची चाहूल यशस्वी ठरेल. आध्यात्मिक आवड उत्तम राहील. आरोग्याची काळजी कमी होईल.