Video: युवकांची जबरदस्त कामगिरी; पोलिसांकडून कौतुक

एक शेळीचे करडू बोअरवेलमध्ये पडल्यानंतर ते जोरजोरात ओरडू लागले. करडाचा आवाज ऐकून त्याला बाहेर काढण्याचा निर्णय युवकांनी घेतला. युवकांचा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी युवकांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

तिरुअनंतपुरम (केरळ): एक शेळीचे करडू बोअरवेलमध्ये पडल्यानंतर ते जोरजोरात ओरडू लागले. करडाचा आवाज ऐकून त्याला बाहेर काढण्याचा निर्णय युवकांनी घेतला. युवकांचा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी युवकांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

एका करडाला वाचवण्यासाठी काही युवकांची धडपड व्हिडिओत पाहायला मिळत आहे. करडासाठी एक युवक स्वतःच्या जीवाची बाजी लावताना दिसत आहे. तिला वाचवण्यासाठी चार युवक एकत्र आले असून, एक युवक चक्क डोक्याच्या दिशेने बोअरवेलमध्ये जात आहे.  अन्य दोन युवकांनी त्याचे दोन्ही पाय धरले आहेत. हा युवक पूर्णपणे आत गेला आणि त्यानंतर त्याने करडाला खेचून बाहेर काढले. करडाला बाहेर काढल्यानंतर ते उड्या मारत आपल्या आईकडे गेले. बकरीला जीवदान देण्यासाठी आपल्या आयुष्याची बाजी लावणाऱ्या या युवकाचे पोलिसांबरोबरच परिसरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, महिप शर्मा यांनी ट्विट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर मुक्या प्राण्यांच्या हत्येच्या अनेक घटना समोर आल्या. त्यावरून एकुणच माणुसकी हरवल्याचे चित्र समोर येत होते. आसाममध्ये बिबट्याची हत्या, हिमाचल प्रदेशमध्ये गायीला ज्वलंत फटाके खायला देणे, औरंगाबाद येथे कुत्र्याला बाईकच्या मागे बांधून फरफटत नेणे, अशा प्रकाराने संताप व्यक्त होत होता. पण, अजूनही माणुसकी शिल्लक आहे, हे सांगणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Title: youth save goat life at kerala video goes viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे