पोलिस दलातील वाहनांचे स्टेअरिंग ताईंच्या हाती!

पोलिस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विभागात अनेक महिला दाखल झाल्या आहेत. प्रत्येक भरती प्रक्रियेमध्ये पोलिस दलात नोकरी मिळावी म्हणून हजारो महिला यात सहभागी होतात.

यवतमाळ: पोलिस दलातील वाहनांचे स्टेयरिंग आता ताईंच्या हातात येणार आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील 11 महिला आता वाहन चालक म्हणून जिल्हा पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात लवकरच रुजू होणार आहेत. या 11 महिलांचे प्रशिक्षण पूर्ण होत असून, या महिला पोलिस दलाची महत्वपूर्ण जबाबदारी लवकरच सांभाळताना दिसणार आहे. आतापर्यंत या विभागात पुरूष मंडळीच वाहन चालक म्हणून असायची. आता या महिला चालकांकडेही जबाबदारी आली आहे.

वेगवेगळ्या भागातून परिस्थितीतून या महिला पोलिस दलात दाखल झाल्या असून, शेतकरी कुटुंबातील या महिला आणि मुली शिपाई म्हणून जिल्हा पोलिस दलात रुजू झाल्या आहेत. दरम्यान, पोलिस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विभागात अनेक महिला दाखल झाल्या आहेत. प्रत्येक भरती प्रक्रियेमध्ये पोलिस दलात नोकरी मिळावी म्हणून हजारो महिला यात सहभागी होतात.

पोलिस दलातील पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील कर्तव्य बाजावावे लागते, असे असले तरी जिल्हा पोलिस दलात एकही महिला पोलिस वाहनांचे चालक म्हणून कार्यरत नाही. दरम्यान पोलिस विभागात कार्यरत आणि इच्छुक महिलांनी वाहन चालक होण्याची संधी विभागातील महिलांना उपलब्ध झाली. त्याद्वारे 11 महिला वाहन चालक पदासाठी विविध पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपाई यांनी आम्हाला वाहन चालक व्हायचे आहे आणि काही तरी वेगळे करायचे आहे, असं चॅलेंज त्यांनी स्वीकारले. यासाठी स्वखुशीने जिल्हा पोलिस मोटार परिवहन विभागात अर्ज सादर केला आणि या सर्व महिलांचे पुणे जिल्ह्यात चालक प्रशिक्षण केंद्र येथे 45 दिवसांचे जानेवारी दरम्यान प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर कोरोना संकटामुळे त्यासर्वांना बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. आता मात्र या सर्व महिला मोटार परिवहन विभागात त्या रुजू झाल्या असून, त्यांनी सराव सुरु केला आहे.

लाईट हेवी वेट वाहने या सर्वजणी चालवतात. आता वाहन चालवत असल्याने आई-वडील नातलग यांना अभिमान वाटतो, असे या प्रशिक्षण करणाऱ्या महिला पोलिस शिपाई आणि वाहन चालक सांगत आहेत. आता त्यांचे येथील प्रशिक्षण पूर्ण होत असून त्या लवकरच पोलिस दलातील वाहन चालक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत, असे मोटार परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे या सर्व महिला चालक म्हणून पोलिस दलाचा अभिमान वाढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

पहिल्यांदा स्टेरिंग सांभाळताना थोडी काळजी वाटली होती. आपण वाहन चालवू शकणार का? असेही वाटले मात्र आता प्रशिक्षणानंतर भीती, चिंता दूर गेल्या आहेत. आता अवजड आणि लाईट वेट असलेले वाहन या महिला सहज रित्या चालवित आहेत. आता स्वतःचा अभिमान वाटतो असेही वाहन चालक प्रशिक्षण करणाऱ्या महिला पोलिसांच म्हणणे आहे.

Title: yavatmal lady police constable driving police vehicle
प्रतिक्रिया (1)
 
Nikhil Daund
Posted on 14 August, 2020

Great work congratulation all Madam

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे