घरात कोणी नसताना चोरट्यांनी केले घर साफ...

दोन्ही ठिकाणी झालेल्या चोरीत साम्य असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. सदरचे दोन्ही गुन्हे पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे नोंद केली आहे.

वर्धा: सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरी झाली आहे. लवकरच दोन्ही घटनेतील आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Video: जीवघेणा स्टंट करणाऱ्या युवकाला आपण पाहिले का?

सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी (ता. 13) दुपारी ३.३० वाजता चंद्रशेखर बाचले (रा. सुखकर्ता नगर, दाते लेआउट, आलोडी) यांनी फोनद्वारे कळविले की ते बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. त्यांची पत्नी सासु, सासरे व मुलगा सेवाग्राम येथे बापुकुटी बघण्यास गेले असल्यामुळे घरी कोणी नव्हते. चोरट्याने दरवाजाचे कुलुप तोडून घरातील साहित्यांची नासधूस केली व कपाटातील सोने व चांदीचे दागिने अंदाजे किंमत २.७० हजार रुपयांचा माल चोरुन नेला. सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार कांचनजी पांडे व पोलिस उपनिरीक्षक गजानन कंगाले यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी केली. तेथूनच ८०० मिटर अंतरावर असलेल्या पद्मावती नगर परीसरात दिलीप जैन यांच्या घरी सुद्धा कुणीही नसताना चोरी झाली. दोन व्हिडिओ कॅमेरा अंदाजे किंमत ४०००० रुपयांचे साहित्य चोरी गेले.

हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून केली चोरी अन्...

दरम्यान, दोन्ही ठिकाणी झालेल्या चोरीत साम्य असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. सदरचे दोन्ही गुन्हे पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे नोंद केली आहे. सदरचा तपास पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा पियुष जगताप, पोलिस स्टेशन सेवाग्रामचे ठाणेदार कांचनजी पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन कंगाले, पोलिस उपनिरीक्षक बानोत, पोलिस शिपाई रवि रामटेके, संदीप चोरे, नागरे कसोशीने करीत आहेत. लवकरच दोन्ही घटनेतील आरोपींना अटक होईल असे, पोलिसांनी सांगितले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघातात पोलिसाचा मृत्यू

Title: wardha district crime news sevagram police register case
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे