हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून केली चोरी अन्...

अमरावती, नागपुर, चंद्रपुर वर्धा परिसरात अनेक मंदिरातील घंटा, देवावरील दागिने, दानपेटी मधील पैसे चोरी केलेले असून त्याचे विरुद्ध अनेक जिल्हयात गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

वर्धा: स्वावलंबी शाळेजवळील संकट मोचन हनुमान मंदिर येथील दानपेटीचे कुलूप तोडून एकाने चोरी केली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन रक्कम ताब्यात घेतली.

सराफाकडील सोने व रक्कम लुटणारा जेरबंद...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वावलंबी शाळेजवळील संकट मोचन हनुमान मंदिर आहे. मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यामधील चिल्लर व नोटा एकूण २०००० रुपये चोरण्यात आले होते. याबाबद चंद्रशेखर मारोतराव राऊत (रा. रामनगर) यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिस स्टेशन रामनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता व त्या अनुषंगाने तपास सुरु होता.

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिसांच्या खबरीकडून माहिती मिळाली. श्रावण कृष्णाजी खाकरे याचा या घटनेशी संबंध आहे, त्यावरुनच त्याचे पुलगाव येथील घरी शोध घेण्यात आला. घटना घडल्यापासून तो पुलगाव येथून निघून गेलेला होता. त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता, त्याने दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरून नेल्याचे कबूल केले. त्याच्या घराची झडती घेतली असता, चोरीचे रुपये हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला. सदर आरोपीने गेल्या १३ वर्षा दरम्यान अमरावती, नागपुर, चंद्रपुर वर्धा परिसरात अनेक मंदिरातील घंटा, देवावरील दागिने, दानपेटी मधील पैसे चोरी केलेले असून त्याचे विरुद्ध अनेक जिल्हयात गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीस संबंधीत गुन्ह्यात अटक करून पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.

दरोडा टाकणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड

सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश ब्राह्मणे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशनात करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र ईंगळे, पोलिस हवालदार संतोष दरगुडे, गजानन लामसे, हमीद शेख, नायक पोलिस शिपाई चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, मनीष कांबळे, गोपाल बावनकर, पोलिस शिपाई जयसिंगपुरे, प्रदीप वाघ, नवनाथ मुंडे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व रामनगर पोलिस यांनी केली.

ऑनलाईन डेटिंग ज्येष्ठाला पडले महागात...

Title: wardha crime news police arrested one person for mandir danp
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे