पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला अन्...

एका दांपत्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला तेंव्हा नऊ महिन्यांचे बाळ एकटेच घरात मृतदेहांकडे पाहून रडत असल्याचे हृदयद्रावक दृष्य पाहायला मिळाले.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): एका दांपत्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला तेंव्हा नऊ महिन्यांचे बाळ एकटेच घरात मृतदेहांकडे पाहून रडत असल्याचे हृदयद्रावक दृष्य पाहायला मिळाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी आणि निखील हे दांपत्य आपल्या बाळासह इंदिरापुरम भागातील ज्ञान खंड-1 मध्ये राहात होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. निखीलने त्याच्या बहिनीला सकाळी सहा वाजता एसएमएस करून बहिनीला घरी बोलावले होते. पण, घराचा दरवाजा बंद होतो आणि बाळ रडण्याचा आवाज येत होता. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडल्यानंतर हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले. पल्लवी आणि निखीलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नऊ महिन्यांचे बाळ मृतदेहांकडे पाहून रडून रांगत होते. दोघांचे मृतदेह तत्काळ खाली घेऊन रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले.

पोलिस अधिकारी अंशू जैन यांनी सांगितले की, दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पल्लीवने ड्रॉईंग रूममध्ये आणि निखीलने बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. बाळाकडे पाहून खूपच वाईट वाटले. मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, दोघांचा मृत्यू झाल्यामुळे बाळ पोरके झाले आहे. पण, यामध्ये बाळाची चूक ती काय? दोघांनी आत्महत्या केल्या की खून करून आत्महत्या झाली की अन्य कारण काय असावे, याबाबत पुढील तपासात सर्व माहिती पुढे येईलच. पण, खरा गुन्हेगार कोण? असा प्रश्न सध्या तरी परिसरातील नागरिकांना पडला आहे.

Title: uttar pradesh police open the door and see the child
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे