पोलिसांना बदनाम करण्याच्या प्रकरणात दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबई पोलिसांना सोशल साईट्सवर बदनाम करणा-या दोन सोशल अकाउंट वर मुंबई सायबर सेलने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबई : मुंबई पोलिसांना सोशल साईट्सवर बदनाम करणा-या दोन सोशल अकाउंट वर मुंबई सायबर सेलने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती दिली आहे. 'ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील काही अकाऊंटधारक मुंबई पोलीस आयुक्तांना ट्रोल करत आहेत. त्यांच्याविरोधात अपशब्दाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या अकाऊंटधारकांवर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खाती बनावट आहेत आणि पोलिसांकडून त्या सर्व बनावट खातेदारांवर कारवाई केली जाईल. दुसरा गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलचा फोटो वापरणाऱ्यांवरही दाखल करण्यात आला आहे. आम्ही या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे,'असे करंदीकर यांनी सांगितले आहे.

Title: Two charges filed in the defamation case against the police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे