तिन मित्रांमध्ये 'या' कारणावरून झाले भांडण अन्...

आमदाबाद (ता. शिरूर, जि. पुणे) येथील बोलाईमाता मंदिरामागील तलावात शुक्रवारी (ता. 26) रात्री मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शनिवारी दोघांना अटक करण्यात आली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

शिरूर : आमदाबाद (ता. शिरूर, जि. पुणे) येथील बोलाईमाता मंदिरामागील तलावात शुक्रवारी (ता. 26) रात्री मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शनिवारी दोघांना अटक करण्यात आली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

एकनाथ दत्तात्रेय जाधव (वय 37, रा. जवळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या खूनप्रकरणी वामन विठ्ठल खुपटे (वय 40) व रोहित ऊर्फ आप्पा शिवाजी गवळी (वय 23, दोघे रा. जवळे, ता. पारनेर, जि. नगर) यांना शिरूर पोलिसांनी अटक केली. तिघे एकमेकांचे मित्र आहेत. कामाच्या निमित्ताने ते शिरूर तालुक्‍यात येत असत. शुक्रवारी बोलाईमातेच्या मंदिरामागील मोकळ्या जागेत एकत्र बसून ते दारू पीत असल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. रात्री जाधव याचा मृतदेह मंदिराजवळील तलावात आढळला. जाधव हा जवळे येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली असता, तो खुपटे व गवळी यांच्यासोबत मलठणला गेला असल्याचे समजले.

पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पोलिस पथकासह शनिवारी सकाळी जवळे येथून खुपटे व गवळी यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी जाधवच्या खुनाची कबुली दिली. दारू पिताना भांडणे झाल्याने ठिबकच्या पाइपने त्याचा गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने मृतदेह तलावात टाकला, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक बी. जे. पालवे पुढील तपास करीत आहेत.

Title: three friend sitting together at aamdabad shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे