पिस्तुल विक्रीसाठी आले अन सापळ्यात अडकले

वालचंदनगर : पुणे जिल्हयाचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळने सुरु केले असुन जिल्हयात गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरु आहेत.वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांनी कारवाई करत गावठी पिस्तुलासह रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

वालचंदनगर : पुणे जिल्हयाचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळने सुरु केले असुन जिल्हयात गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरु आहेत.वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांनी कारवाई करत गावठी पिस्तुलासह रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे कि, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह वालचंदनगर-भिगवण हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे किरण कुसाळकर यांना गोपनिय बातमी मिळाली होती.या माहितीवरून दहशतवाद विरोधी पथकाने वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स्टाफ  यांच्या मदतीने मुक्तार अजीज शेख (वय.१९ वर्षे),योगेश कचरू धोत्रे (वय.२१ वर्ष दोघेही राहणार-  गोधेगाव तालुका- नेवासा जिल्हा- अहमदनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल व ६ जिवंत काढतुस जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर, गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक  पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, विश्वास खरात, राजेश पवार , पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे,किरण  कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंद नगर पोलीस स्टेशन स्टाफ पोलीस हवालदार प्रकाश माने, विशाल निर्मळ, नितीन कळसराइत व विजय शेंडकर पथकाने केली.

 

Title: The pistol came for sale and got trapped
प्रतिक्रिया (1)
 
Govind kumkar
Posted on 15 October, 2020

चागंली कामगिरी केली .असेच कार्य करीत राहावे. अभिनव देशमुख साहेब यांनी गुन्हेगार ची पळती भुइ केली आहे....... अभिनंदन सर्व ठिम चे

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे