शेतक-याच्या मुलीने पटकाविला 'मिस इंडिया' किताब

शिरूर :महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणा-या सहाय्यक पोलीस निरीक्षक व शिरूरजवळील म्हसे खुर्द (ता.पारनेर) येथील आशा मदगे यांनी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत मिस इंडियाचा मुकुट पटकावला आहे

शिरूर :महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणा-या सहाय्यक पोलीस निरीक्षक व  शिरूरजवळील म्हसे खुर्द (ता.पारनेर) येथील आशा मदगे यांनी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत मिस इंडियाचा मुकुट पटकावला आहे.त्यांच्या या यशाबद्दल शिरूर आणि पारनेर तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.      

पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील बाळू मदगे या शेतकऱ्याची आशा ही मोठी मुलगी आहे. तिने लहानपणापासून मॉडेल बनण्याचे ध्येय ठेवले होते. पण नंतर त्यांच्या दिशा बदलल्याने ती 2009 मध्ये पुणे पोलिस दलात भरती झाली. दोन वर्षात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. मुंबईत नियुक्ती मिळाली. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. त्यांनी पोलीस दलात असताना स्वतःचे शरीर व्यायाम करून बळकट बनवले. त्याचबरोबर आवड असल्याने डान्स, गायन सुरु ठेवले. चेहऱ्यावर सुंदरता असल्याने त्यांनी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

मागील महिन्यात मिस क्वीन इंडिया सीजन - 3 साठी अर्ज दाखल केले. अखेर शनिवारी दिल्ली येथे झालेल्या मिस क्वीन इंडिया स्पर्धेत आशा यांनी बाजी मारली. मिस क्वीन इंडिया 2020 मध्ये फर्स्ट रनरचा मुकुट ही मिळवला. त्यांच्या यशाने पारनेर तालुक्यात प्रथमच मिस इंडियाचा बहुमान मिळाला.तिच्या या यशाबद्दल कुटुंबियांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.जिद्द आणि चिकाटी असेल  समोर ध्येय असेल तर खेडेगावातील मुलीही आकाशाला गवसणी घालू शकतात. खूप संघर्ष करून मी आज या ठिकाणी पोहचले आहे. लहानपणापासून मी जे स्वप्न पाहीले होते ते आज सत्यात उतरले, याचा मनापासून आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया आशा मदगे यांनी व्यक्त केली.

Title: The farmer s daughter won the book Miss India
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे