पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

रांजणगाव गणपती : पोलीसांनी ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगासने व व्यायाम केलाच पाहिजे व स्वतःच्या शरीरासाठी दिवसातला काही वेळ दिलाच पाहिजे तरच शरीराचे व मनाचे व्यवस्थापन योग्य होईल असे प्रतिपादन शिवाजी कुचे यांनी रांजणगाव एमआयडीसी येथे केले.

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांसाठी विविध विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.रांजणगाव एमआयडीसी येथे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिमन्यु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी कुचे, अमरावती यांचे रांजणगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या  पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या करिता ताण तणाव व्यवस्थापन, नकारत्मतेतून सकारात्मकतेकडे,कोरोना फोबिया व योगा या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेचा रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल कदम,पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांच्यासह २१ पोलिस जवान,११ होमगार्ड, व पोलीस पाटील अशा एकूण सुमारे ४० ते ४५ कोव्हिड योद्ध्यांनी लाभ घेतला.

Title: Stress management workshop for police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे