पोलिसकाकांना टँकर वेडावाकडा येताना दिसला अन्...

सोलापूर विभागातील महामार्ग पोलिस मदत केंद्र पाकणी येथील पोलिस नाईक संजय चौगुले (बक्कल नंबर 225) सावळेश्वर टोलनाक्यावर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना समोरुन एक गॅस टँकर वेडावाकडा येताना दिसला. ते पाहून चौगुले यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला.

सोलापूर : एक गॅसने भरलेला टँकर वेडावाकडा येताना दिसल्यावर पोलिसकाकांनी तत्काळ धाडस करत टँकरवर ताबा मिळवला. पोलिसकाकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संजय विठोबा चौगुले असे पोलिस कर्मचाऱयाचे नाव आहे. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

सोलापूर विभागातील महामार्ग पोलिस मदत केंद्र पाकणी येथील पोलिस नाईक संजय चौगुले (बक्कल नंबर 225) सावळेश्वर टोलनाक्यावर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना समोरुन एक गॅस टँकर वेडावाकडा येताना दिसला. ते पाहून चौगुले यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. पण चालक हा बेशुद्ध दिसल्याने चौगुले मोठ्या शिताफिने धावत्या गॅस टँकरवर चढले. चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून ब्रेक मारुन त्यांनी टँकर थांबवला.

संजय चौगुले स्वत:चा जीव धोक्यात घालत टॅंकरवर चढले. अ‍ॅक्‍सिलेटरवर असलेला चालकाचा पाय काढला आणि स्वत:चा पाय ब्रेकवर ठेवला आणि टॅंकर थांबवला. चौगुले यांच्या धाडसी कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली. सोलापुरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिस नाईक संजय चौगुले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालकमंत्री दत्ता भरणे यांनीही चौगुलेंचे कौतुक केले आहे.

Title: solapur police sanjay chaugule stops running gas tanker afte
प्रतिक्रिया (1)
 
करण कोरडे पाटील
Posted on 13 September, 2020

अभिनंदन साहेब सलाम

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे