शिरुर पोलिसांच्या तत्परतेने महिलेच्या चेह-यावर आले हसु

शिरुर : पायी चालणा-या महिलेच्या पाच तोळे सोन्याच्या बांगड्या चोरी करुन पळुन गेलेल्या आरोपीस गजाआड़ करुन महिलेस सर्व बांगड्या परत देउन शिरुर पोलीसांनी महिलेच्या चेह-यावर पुन्हा हास्य आणले आहे.

शिरुर : पायी चालणा-या महिलेच्या पाच तोळे सोन्याच्या बांगड्या चोरी करुन पळुन गेलेल्या आरोपीस गजाआड़ करुन महिलेस सर्व बांगड्या परत देउन शिरुर पोलीसांनी महिलेच्या चेह-यावर पुन्हा हास्य आणले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,लिला दिपक बिडवे(वय.६१,रा.शिरुर) या दि.७रोजी बी.जे.कॉर्नर रोड ने पायी चालल्या होत्या.यावेळी पाठीमागुन येउन आरोपींनी, फिर्यादी यांना पोलीस असल्याचे बतावणी करुन पाच तोळे सोन्याच्या(२लाख ५० हजार) रुपये किंमतीच्या ४ बांगड्या हातातुन काढायला लावल्या.व हिसका देउन पळुन गेले.याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास शिरुर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सुरु केला.यावेळी तपास पथकाने तांञिक तपास करत आरोपी मुस्लीम यासीन इराणी याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.या आरोपीस ताब्यात घेउन पोलीसांनी आरोपीकडुन चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान गुन्हयातील सर्व चोरी गेलेल्या पाच तोळे सोन्याच्या बांगड्या शिरुर पोलीसांनी वयोवृद्ध महिलेला सन्मानपुर्वक ताब्यात दिल्या.यावेळी फिर्यादी महिलेने तपास पथकाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

हि कामगिरी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,पोलीस नाईक संजु जाधव,पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे,संजय साळवे,विजय जंगम,करणसिंग जारवाल यांनी केली आहे.

Title: shirur police returned all banngles to cinior citizen
प्रतिक्रिया (1)
 
Jagdale Swapnil Uddhav
Posted on 28 June, 2020

अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ड्युटी केल्याबद्दल शिरूर पोलीस स्टेशन चे मनापासून अभिनंदन🙏💯💐💐💐

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे