दरोड्यातील आरोपी ५ तासांत गजाआड

शिरुर: आमदाबाद-शिरुर रस्त्यावर कंटेनर मधील चालक व अॉपरेटर ला मारहान करुन दरोड्याचा प्रयत्न करुन पसार झालेल्या पाच आरोपींना शिरुर पोलीसांनी अवघ्या पाच तासात मुद्देमालासह गजाआड केले आहे.

शिरुर: आमदाबाद-शिरुर रस्त्यावर कंटेनर मधील चालक व अॉपरेटर ला मारहान करुन दरोड्याचा प्रयत्न करुन पसार झालेल्या पाच आरोपींना शिरुर पोलीसांनी अवघ्या पाच तासात मुद्देमालासह गजाआड केले आहे.

या दरोड्याप्रकरणी अविनाश शहाजी कारखिले(वय.३१,रा.राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर), योगेश पुंडलिक मदगे (वय.३०, रा.पाषाणमळा, बायपास,शिरुर), सुनिल अशोक घावटे (वय.३१, रा. पाषाणमळा, बायपास, शिरुर), सचिन कारभारी मदगे (वय.३२,रा.बाबुरावनगर, शिरुर), रवि बाळशिराम झंझाड (रा.अण्णापुर) असे अटक केलेल्या संशयीतआरोपींची नावे आहे.  दादा शिवाजी साळवे (रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी दादा साळवे,दिपक लव्हे,अनिल चौधरी हे कंटेनर नं(एम.एच.११ सी.एच.१३५४) मधुन सचिन सुदिक (रा.कर्जत) यांच्या मालकीची पोकलॅंड मशीन जुन्नर येथुन घेउन नारायणगाव, पारगाव, मलठण मार्गे शिरुर रोडने कर्जतला जात असताना (दि.१) रोजी राञी दहा च्या सुमारास आमदाबाद गावच्या हद्दीत मळगंगा लोंस मलठण जवळ जात असताना सिल्व्हर कलरची स्कोडा (एम.एच.१२ इएक्स.३१११) या कारमधुन पाच व्यक्तींनी येउन कंटेनरला कार आडवी लावुन कंटेनर उभा करुन कारमधील पाचही व्यक्तींनी येउन चालक व अॉपरेटर यांना जवळ असलेले पैसे काढुन द्या असे म्हणत मारहान करुन दोन बॅटर-या (वीस हजार रुपये किंमतीच्या, मोबाईल, व्हील पाना व लोखंडी झॅक असा ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच शिरुर पोलीसांनी अण्णापुर, मलठण, टाकळी हाजी परिसरात नाकाबंदी केली व ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांना मदतीची विनंती केली. यावेळी मलठण येथील ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी ठिकठिकाणी नाकाबंदी साठी वाहने आडवी लावली. नाकाबंदी दरम्यान शिरुर पोलीसांचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी अण्णापुर येथील बसथांब्याजवळ एका कारचा संशय आल्याने त्या कारला अडवुन चौकशी केली. यावेळी कारमध्ये आरोपींकडे दरोड्यातील चोरीचा माल मिळुन आला तसेच सश्याची शिकार केली असल्याने आरोपींकडे मयत ससा गाडीत डिक्कीत मिळुन आला.सदर आरोपींना अटक करुन शिरुर पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले.

हि कामगिरी शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,पोलीस नाईक मुकुंद कुडेकर, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे, प्रविण पिठले, राजेंद्र गोपाळे, सागर गुणवरे ,करणसिंग जारवाल यांच्या पथकाने केली.

Title: shirur police acused arreseted in five hours
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे