अपहरण करुन सुरक्षारक्षकाचा खुन करणारे आरोपी २४ तासात गजाआड़

रांजणगाव गणपती : कुठलाही पुरावा नसताना रांजणगाव एमआयडीसी(ता.शिरुर) पोलिसांनी मोठ्या कसोशीने तपास लावत रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील सुरक्षारक्षकाचे अपहरण करुन खुन करणा-या आरोपींना अवघ्या २४ तासात गजाआड़ करण्याची कामगिरी केली आहे.

रांजणगाव गणपती : कुठलाही पुरावा नसताना रांजणगाव एमआयडीसी(ता.शिरुर) पोलिसांनी मोठ्या कसोशीने तपास लावत रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील सुरक्षारक्षकाचे अपहरण करुन खुन करणा-या आरोपींना अवघ्या २४ तासात गजाआड़ करण्याची कामगिरी केली आहे.

रामआसरे लालमन मिश्रा(वय.५५,मुळ रा.उत्तरप्रदेश) असे खुन झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असुन कमलेश भिमराव पवार(वय.२१,रा.निर्वी),विकास बाळासाहेब जगताप(वय.२१,रा.कोहकडेवाडी-न्हावरा),सुञधार लक्ष्मण शिंदे(वय.२०,रा.शिरसगाव काटा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(दि.१८) रोजी रांजणगाव एमआयडीसीतील वेअरहाउस मध्ये सुरक्षारक्षक म्हणुन काम करणा-या रामआसरे यांना अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरुन अपहरण करुन नेले असल्याबाबत खंडु काळु बो-हाडे यांनी रांजणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती.त्यानुसार रांजणगाव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता.

अपहरणाच्या गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेत रांजणगाव पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित आरोपींचा शोध घेणे सुरु केले होते.रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कसोशीने व तांञिक तपास करत गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळवत संशयित आरोपी कमलेश पवार,विकास बाळासाहेब जगताप,सुञधार शिंदे यांना ताब्यात घेतले.यावेळी पोलीसी हिसका दाखवताच आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली.अपहरण केलेल्या व्यक्तीच्या बॅंकेच्या अकाउंट वर मोठी रक्कम होती.ती रक्कम अपहरण करुन एटीएम मधुन काढुन घेण्याचा प्लॅन होता परंतु अपहरण झाल्यानंतर सुरक्षारक्षक रामआसरे याने विरोध केल्याने आरोपींनी त्यास ठार मारुन पारगाव(ता.दौंड) येथील पुलावरुन भिमानदी पाञात मयत रामआसरे याला फेकुन दिले.

सदर आरोपींच्या सांगण्यावरुन पोलिसांनी भिमानदी पाञात मयताचा शोध घेतला असता वडगाव रासाई हद्दीत खुन केलेला मृतदेह मिळुन आला.याबाबत  रांजणगाव पोलिस स्टेशनला खुनाच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

कुठलाही पुरावा नसताना रांजणगाव पोलिसांनी केवळ चोवीस तासात अपहरण व खुनाचा गुन्हा उघडकिस आणला असुन हि कामगिरी रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत,सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम,पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे,पोलिस हवालदार तुषार पंदारे,पोलिस नाईक अजित भुजबळ,चंद्रकांत काळे,किशोर तेलंग,मंगेश थिगळे,प्रफुल्ल भगत,ज्ञानेश्वर शिंदे,अमोल चव्हाण,मिलिंद देवरे,उद्धव भालेराव,अमोल नलगे,विजय शिंदे यांच्या पथकाने केली.

Title: ranjangav police acused arrested in security gurad murder
प्रतिक्रिया (2)
 
Khandu Borade
Posted on 20 July, 2020

Really Great worke. Salute to Maharashtra Police

Shivaji pawar
Posted on 19 July, 2020

Great wark

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे