सेक्स रॅकेटची मास्टरमाइंड राजकीय महिला गजाआड...

काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकारी एकत्रितपणे देहविक्रयचा व्यवसाय चालवित असल्याची बाब समोर आले होते. देशभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जयपूर (राजस्थान) : सेक्स रॅकेटची मास्टरमाइंड असणारी काँग्रेस महिला नेता पूजा उर्फ पूनम चौधरी हिला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 20 दिवसांपासून ही महिला फरार होती. राजस्थानमध्ये या सेक्स रॅकेटप्रकरणात ही आठवी अटक आहे. पूजावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा कट रचण्याचाही आरोप आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला धमकी देणारा अटकेत

सवाईमाधोपूर येथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकारी एकत्रितपणे देहविक्रयचा व्यवसाय चालवित असल्याची बाब समोर आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपने या महिलेला पक्षातून निलंबित केले होते. देशभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा उर्फ संपती बाई हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. काँग्रेस सेवादलातील महिला माजी जिल्हाध्यक्ष पूजा उर्फ पूनम चौधरी फरार होती. त्यानंतर पोलिस तिच्या मागावर होते. तिलाही अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

सामुहिक बलात्कार कसा करावा सांगणारी पोस्ट व्हायरल...

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दोन्ही महिला एकत्रितपणे हा गैरव्यवहार करीत होते. त्यांच्या या गैरव्यवहारात अनेक युवती आणि महिला अडकल्या आहेत. आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये सुनीताची सोबती हिरालाल, जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिपाई श्योराम मीना, जिल्हा उद्योग केंद्राचा लिपिक संदीप शर्मा आणि इलेक्ट्रिशयन राजूलाल रॅगर यांचा समावेश आहे. देशातील प्रमुख पक्षातील नेत्यांच्या या गैरव्यवहारामुळे मोठा गदारोळ झाला आहे.

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हे कमी: गृहमंत्री

एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर दोन्ही महिला एकत्रित काम करीत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या शहरांमध्येही त्याचे कनेक्शन आहेत. दरम्यान यापैकी एका महिला नेत्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामध्ये तिने दोन्ही दलांमध्ये अत्यंत घाणेरडे व चरित्रहीन लोक असून, वेळ आल्यावर त्यांचा पदार्फाश करेल असे लिहिले होते.

महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीने शान वाढलीः गृहमंत्री

Title: rajasthan racket mastermind congress woman leader arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे