ड्रग्ज प्रकरणात आता विवेक ओबेरॉयच्या घरावर छापा

मुंबई : सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरण गाजत असताना आता अभिनेता विवेक ओबेरॉय याच्याही घरावर छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

मुंबई : सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरण गाजत असताना आता अभिनेता विवेक ओबेरॉय याच्याही घरावर छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

विवेक ओबेरॉयच्या बायकोचा भाऊ आदित्य अल्वा हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. हाय प्रोफाइल पार्टीमधील तो एक लोकप्रिय चेहरा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले.

आदित्य अल्वा गायब आहे. तो विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आणि त्याच्या घरी आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं बंगळुरू पोलिसांनी सांगितलं. बंगळुरू पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या जुहूतील घरात पोहोचले. दोन पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी दाखल झाले. तेव्हापासून त्याच्या घरात तपास केला जातो आहे.

Title: Raid on Vivek Oberoi s house now in drug case
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे