पोलिसकाकांच्या तत्परतेमुळे वाचले युवकाचे प्राण...

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे सत्र सुरु असताना पोलिस काकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका युवकाचा प्राण वाचला आहे. नातेवाईकांनी पोलिस काकांचे आभार मानले आहेत.

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे सत्र सुरु असताना पोलिस काकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका युवकाचा प्राण वाचला आहे. नातेवाईकांनी पोलिस काकांचे आभार मानले आहेत.

पुणे शहरातील मार्केयार्ड पोलिसांनी युवकाचे प्राण वाचवले आहेत. जुन्या वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा हा युवक लॉकडाऊनमुळे कर्जात बुडाला होता. पैसे देणार्‍यांचे दररोज फोन येत होते. पण त्यांना तो खोटी आश्वासने देऊ शकत नव्हता. त्यामुळे तो आत्महत्या करायला चालला होता. पोलिस नियंत्रण कक्षाला रविवारी (ता.21) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्याने मार्केटयार्ड येथील हाईड पार्क येथे राहणारा त्याचा मित्र आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.

या माहितीवरुन मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील बीट मार्शल मकसुद तांबोळी आणि उत्तम शिंदे यांनी तातडीने त्याचे घर शोधून काढले व फ्लॅटचा दरवाजा वाजवून उघडण्याची विनंती केली. त्यावेळी आतील युवकाने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास नकार दिला. साहेब तुम्ही कृपा करुन निघून जावा, मी आज खूप टेंशनमध्ये असून, मला आज आत्महत्या करायची आहे, असे मी मित्रांनाही फोनद्वारे कळविले आहे. पोलिसांनी त्याला विनवणी करत समजावून सांगितले. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला. त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक खटके, उपनिरीक्षक भोसले यांनी त्याला समजावून सांगितले. त्याच्या भावाला बोलावून घेतले.

कोरोनामुळे व्यवसाय बंद झाला आहे. काही व्यवहार अडकले असून, त्यामुळे कर्ज झाले आहे. पैसे देणे असल्याने दररोज फोन येत होते. देणेकऱ्यांना खोटे बोलता येत नव्हते. गेले दोन ते तीन दिवस घरात एकटाच होतो. आत्महत्या केल्यानंतर बाकीची काहीही कटकट राहणार नाही, असे वाटल्यामुळे आत्महत्येचा पर्याय निवडला. पोलिसांनी त्याला समजावून सांगितले. ज्यांचे पैसे तो देणे होता, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. तसेच त्यांना पैशासाठी फोन न करण्यास सांगितले़ व व्यवसाय पुन्हा जोमाने सुरु करुन पैसे देण्यास सांगितले. पोलिसांच्या सहकार्यामुळे या युवकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व त्याने पुन्हा नव्याने व्यवसाय जोमात सुरु करण्याचे पोलिसांना आश्वासन दिले.

Title: pune police save youth life
प्रतिक्रिया (1)
 
santosh
Posted on 23 June, 2020

अभिनंदन...

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे