पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेची धडाकेबाज कारवाई

संबंधित आरोपींनी अशाच प्रकारे शिरूर, अहमदनगर मार्केट यार्ड, पाईपलाईन रोड, अहमदनगर अशा वेगवेगळया ठिकाणी हार्डवेअर पत्रे विक्रेते, पेंट विक्रेते, फर्निचर विक्रेते, तेलाचेडबे विक्रेते, भुसापेंड विक्रेते यांचेकडुन देखील अशाच प्रकारे विक्रेत्याची फसवणुक करून माल घेवून गेल्याचे सांगीतले आहे.

पुणेः शिक्रापूर येथील हार्डवअर दुकानदाराला एक लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक करणाऱयाला पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने अटक केली असून, त्याच्या ताब्यातील माल जप्त केला आहे.

सराफाकडील सोने व रक्कम लुटणारा जेरबंद...

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शीवशक्ती हार्डवेअर ऍण्ड प्लाय दुकाणाचे मालक हितेश अशोककुमार प्रजापती (वय 22, रा. शिक्रापूर, ता.शिरूर, जि. पुणे) हे बुधवारी (ता. 7) हे दुकाणामध्ये असताना एका व्यक्तीने त्यांना फोन करून बांधकामासाठी साहीत्य लागणारे आहे असे सांगितले. पत्रे, अँगल, जाळी व इतर साहीत्य पाहिजे असल्याचे सांगून तो माल वाडेगव्हाण (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे पाठवून दया असे म्हणाला. माल भेटल्यावर पैसे देतो असे सांगून विश्वास संपदान करून दुकानदार यांनी दुकाणातील 97,200 रुपये किंमतीचे बांधकामासाठी लागणारे पत्रे, लोखंडी ऍंगल, बार, चॅनल, जाळी पाठवून दिले होते. जातेगाव अहमदनगर येथे अज्ञात आरोपींनी तो माल उतरवून घेवून पैसे शिरूरला देतो असे सांगितले. फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक करून माल घेवून निघून गेले होते. त्यावरून शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. माल घेवून गेल्यानंतर फिर्यादीचा त्या अज्ञात व्यक्तीशी संपर्क होत नव्हता. सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपींनी केला होता.

दरोडा टाकणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड

पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण यांचे पथकाकडून समांतर तपास चालू होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पुणे-नगर रोडचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून, गुप्त बातमीदारांचे मार्फत माहिती काढून व तांत्रीक विश्लेषन करून सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक गणेश गुगळे, (रा. माका ता. नेवासा जि. अहमदनगर) याने केल्याची माहीती मिळाली.

सराईत गुन्हेगाराकडुन जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल

सदरचा आरोपी रामलींग (ता. शिरूर जि. पुणे) या ठिकाणी गुरुवारी (ता. 15) येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेवून तपास केला. त्याचे नाव दिपक गणेश गुगळे (वय 20, रा. माका ता. नेवासा जि. अहमदनगर) असे सांगून त्याने सदर गुन्हयातील मुद्देमाल त्याचा मित्र शाहदेव म्हस्के (वय 25) याचे मदतीने करून त्याला माल दिल्याचे सांगितले. शाहदेव उर्फ शाहु दिलीप म्हस्के, वय 25 वर्ष, रा. सदर यास देखील ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयातील हार्डवेअरचे साहित्य 97,200 रु आणि गुन्हयात वापरलेला 407 टॅम्पो (एम एच 16 क्यु 2813) मिळून आलेला आहे. सदर आरोपींची वैदयकीय तपासणी करून पुढील कारवाई करीता शिक्रापूर पोलिस स्टेशनला हजर केले आहे.

पोलिस उपनिरीक्षक शांतप्पा यांना कडक सॅल्यूट!

संबंधित आरोपींनी अशाच प्रकारे शिरूर, अहमदनगर मार्केट यार्ड, पाईपलाईन रोड, अहमदनगर अशा वेगवेगळया ठिकाणी हार्डवेअर पत्रे विक्रेते, पेंट विक्रेते, फर्निचर विक्रेते, तेलाचेडबे विक्रेते, भुसापेंड विक्रेते यांचेकडुन देखील अशाच प्रकारे विक्रेत्याची फसवणुक करून माल घेवून गेल्याचे सांगीतले आहे.

पोलिस खात्यातील कर्तव्यदक्ष संवेदनशील अधिकारी; पद्माकर घनवट

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहीते, यांचे मार्गदशनाखाली पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकामधील कर्मचारी राम धोंडगे, दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, उमाकांत कुंजीर, जनार्धन शेळके, राजू मोमीन, श्री. राजापुरे यांनी केली.

पोलिसकाकांच्या मृत्यूनंतर तासाभरात मुलीनेही सोडला प्राण...

Title: pune lcb team arrested two persron for crime case shikrapur
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे