'मुन्नाभाई एमबीबीएस' अशी करायचा चोरी...

हडपसर पोलिसांनी डॉक्‍टरच्या वेशात वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल पावणेचार लाखाची चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याने वर्षभरापूर्वी फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे चोऱ्या केल्या होत्या.

पुणे : हडपसर पोलिसांनी डॉक्‍टरच्या वेशात वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल पावणेचार लाखाची चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याने वर्षभरापूर्वी फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे चोऱ्या केल्या होत्या. या गुन्हयात त्याला जानेवारी महिण्यात जामिन मिळाला होता. यानंतर त्याने पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरु केले होते.

चोरी करताना संशय येऊ नये म्हणून डॉक्‍टरचे ऍप्रन, स्टेथोस्कोप, ससून रुग्णालयात एमबीबीएस डॉक्‍टर असल्याचे ओळखपत्र घालायचा. शाहरुख रज्जाक पठाण (वय 23, रा. शेळके मळा, यवत, ता. हवेली, मुळ गाव उदाची वाडी, वनपुरी ता.सासवड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लॉक डाऊनच्या कालावधीतही वाहन चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे घडत होते. यामुळे गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी हडपसर पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक हिमालय जोशी व तपास पथकातील कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी पोलिस नाईक नितीन मुंढे, विनोद शिवले यांना खबर मिळाली की, द्राक्ष संशोधन केंद्रामागे सराईत वाहन चोर शाहरुख पठाण संशयास्पदरित्या थांबला आहे. त्यानूसार त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडील होंडा ऍक्‍टिव्हाची माहिती घेतली असता, ही गाडी मांजरी शेवाळवाडी येथून चोरी केल्याचे आढळले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याला ताब्यात घेतल्यावर तपासादरम्यान त्याने हडपसर, कोंढवा, बंडगार्डन या परिसरामध्ये वाहनचोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरीची सात दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली. याची किंमत 3 लाख 85 हजार इतकी आहे. त्याने फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्हयात 26 चोरीच्या दुचाकी, तीन चारचाकी व एक टेम्पो हस्तगत करण्यात आला होता. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी. पोलिस उपायुक्‍त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक हिमालय जोशी, सहायक फौजदार युसुफ पठाण, पोलिस कर्मचारी रमेश साबळे, राजेश नवले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे, नरसाळे, कांबळे यांच्या पथकाने केली.

Title: pune hadapsar police arrested fake munnabhai mbbs
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे