अवैध धंद्यांवर मुळासकट कारवाई करणार: डॉ. अभिनव देशमुख

पुणे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडगिरी व वाळूमाफियांची दहशत कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी धडक कारवाईचे सत्र राबविले जाईल.

शिरूर: पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी थोपविण्यासाठी प्रयत्न केले जातील त्याबरोबरच अवैध धंद्यांवर मुळासकट कारवाई करण्यास प्राधान्य राहिल, असे पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शिरूर येथे बोलताना सांगितले.

औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार: डॉ. अभिनव देशमुख

डॉ. अभिनव देशमुख यांनी शिरूर येथे भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडगिरी व वाळूमाफियांची दहशत कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी धडक कारवाईचे सत्र राबविले जाईल. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेली सेवा पोलिस खात्याकडून दिली जाईल.

पुण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख

पुणे जिल्ह्यातील चाकण, शिक्रापूर, रांजणगावसह सर्वच औद्योगिक पट्ट्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढून उद्योगधंद्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करणे, जिल्ह्यातील वहातूक समस्या सोडवणे आणि पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान होईल, असा पारदर्शी कारभार ठेवणे, या गोष्टीवर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा बदल्यांचे ठिकाण

Title: pune district sp dr abhinav deshmukh visit shirur and said
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे