सराफाकडील सोने व रक्कम लुटणारा जेरबंद...

पाठीमागून धडक देऊन अपघात करून त्यांना खाली पाडले. त्यावेळी त्यांची बाजूला पडलेली काळे रंगाची सॅक पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी उचलून नेली होती. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरूर (पुणे): रांजणगाव गणपती येथील सराफाला धडक देऊन पाडून त्याच्याकडील 800 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणारा अट्टल जबरी चोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.

दरोडा टाकणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड

रांजणगाव गणपती हद्दीतील सराफ दुकानदार श्रवण सिंग मोहब्बत सिंग परमार (रा. अमरदीप सोसायटी, कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) हे गुरुवारी (ता. 15) त्यांचे मंगलमूर्ती ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान बंद करून दुकानातील विक्री करता असलेले 882 ग्रॅम 736 मिलि वजनाचे सोन्याचे दागिने व दिवस दिवसभरात झालेल्या धंद्याची रोख रक्कम 40,000/- रुपये असे एकूण 27,55,780/- रुपयांचा माल घेऊन त्यांचे कामगारांसह घरी येत होते. पाठीमागून धडक देऊन अपघात करून त्यांना खाली पाडले. त्यावेळी त्यांची बाजूला पडलेली काळे रंगाची सॅक पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी उचलून नेली होती. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ऑनलाईन डेटिंग ज्येष्ठाला पडले महागात...

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यात आला. रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी संतोष अनिल गायकवाड (वय 28  रा. धानोरा, ता. आष्टी जि. बीड, सध्या रा.खंडोबा मंदिराजवळ रांजणगाव, ता. शिरूर जि. पुणे) हा रांजणगाव येथे असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, जनार्दन शेळके यांनी कारवाई करत सदर ठिकाणाहून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी रांजणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगाराकडुन जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल

Title: pune district lcb team and ranjangaon police arrested robber
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे