पोलिसांना 'तिला वाचवा' म्हणून कॉल आला अन्...

पोलिस नियंत्रण कक्षातून पोलिसांना फोन आला. "नाना नानी पार्क येथे एक वृद्ध महिला नदीत आत्महत्या करण्यासाठी जात आहे. तिला वाचवा', पोलिसांनी क्षणाचाही विलंब न दवडता घटनास्थळी धाव घेतली आणि एका ज्येष्ठ महिलेचे प्राण वाचवले.

पुणे: पोलिस नियंत्रण कक्षातून पोलिसांना फोन आला. "नाना नानी पार्क येथे एक वृद्ध महिला नदीत आत्महत्या करण्यासाठी जात आहे. तिला वाचवा', पोलिसांनी क्षणाचाही विलंब न दवडता घटनास्थळी धाव घेतली आणि एका ज्येष्ठ महिलेचे प्राण वाचवले.

रविवारी (ता. 28) सकाळी साडे आठ वाजता "नाना नानी पार्क येथे एक वृद्ध महिला नदीत आत्महत्या करण्यासाठी जात आहे. तिला वाचवा." असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षातुन शिवाजीनगर बीट मार्शल पोलिस कर्मचाऱ्याना आला. त्याचवेळी एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी महिलेचे कुटुंबीय खडक पोलिस ठाण्यात झाले होते. खडक पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस कर्मचारी महिलेच्या शोधासाठी निघाले. त्यावेळी त्यांना नदी पात्रात एक महिला आत्महत्या करण्यासाठी जात असल्याची खबर मिळाली. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तळपे, एकशिंगे, जगदाळे, गिरहे, कोल्हे, यादव, ननवरे असे दोन्ही पुलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नाना नानी पार्क येथे दाखल झाले. पोलिसांना एक 75 वर्षीय महिला नदीमध्ये आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे दिसून आले. पोलिस कर्मचाऱ्यानी महिलेला थांबवून तिची विचारपुस केली. त्यानंतर महिलेचे समुपदेशन करून तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले. पोलिसांनी एका महिलेला आत्महत्येपासून परावृत्त केल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज किमान एक ते दोन आत्महत्या होत असल्याची सद्यस्थिती आहे. वेगवेगळ्या कारणानी होत असलेल्या या आत्महत्या केवळ पोलिसांचाच नाही, तर सर्वसामान्य नागरीकांच्यादृष्टिनेही चिंतेची बाब बनली आहे. या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी देखील महत्वाचे पाऊल उचलले आहे. पोलिस नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत.

Title: pune city police save womens life
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे