आठ पोलिसांना झाली कोरोनाची लागण अन्...

पुणे शहरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी (ता. 1) शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत चार ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुणे : पुणे शहरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी (ता. 1) शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत चार ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाजीनगर परिसरातील एका पोलिस ठाण्यातील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ठाण्यातील सर्वच 27 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना झालेल्यामध्ये एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. यामुळे शहर पोलिस दलात एकाच खळबळ उडाली. शहर पोलिस दलातील 125 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतांश पोलिस कर्मचारी हे बरे झाले असून. काही जण पुन्हा कामावर परतले आहेत. शहराच्या पश्चिम भागातील एका पोलिस ठाण्यातील एक उपनिरीक्षक आणि दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करीत असलेले 10 पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ससून हॉस्पिटलजवळील पोलिस एका पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, 27 जून रोजी 10 पोलिसांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हा सुमारे 30 जणांना क्वारंटाइन केले होते. शहरात आजवर 125 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील अनेकजण उपचार घेतल्यानंतर करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये एका सहायक पोलिस आयुक्ताचा समावेश आहे.

Title: pune city eight police corona positive and 27 police quranti
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे