पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन्...

पुलगाव (वर्धा): येथे दारुगोळा भांडारात अजय कुमार सिंग हा (मूळ बिहार राज्यातील रहिवासी) सैनिक कार्यरत आहे. बुधवारी (ता. 1) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास अजय कुमार सिंगने स्वतःच्या सर्व्हिस गनने पत्नीवर गोळी झाडली, त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली.

पुलगाव (वर्धा): येथे दारुगोळा भांडारात अजय कुमार सिंग हा (मूळ बिहार राज्यातील रहिवासी) सैनिक कार्यरत आहे. बुधवारी (ता. 1) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास अजय कुमार सिंगने स्वतःच्या सर्व्हिस गनने पत्नीवर गोळी झाडली, त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. या आवाजाने कॅम्प परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आत्महत्येच्या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अजयसिंग हा मूळचा बिहार येथील असून बुधवारी रात्री तो ड्युटीवरून घरी आला होता. यानंतर त्याच्या घरातून गोळी झाडण्याचा आवाज आल्याने कॅम्प परिसरात खळबळ उडाली. कॅम्पच्या आतील परिसरात राहणाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांना तत्काळ कॅम्प परिसरात असणाऱ्या सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच प्रियंकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अजय कुमारची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात नेण्यात आले. पण, उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आत्महत्येची पुलगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. नंतर फॉरेन्सिक टीमकडून आणखी काही माहिती मिळते का, याची चौकशी केली जाणार आहे. घरात रक्ताचा सडा आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांना ज्या बंदुकीने त्याने गोळीबार केला ती बंदूक मिळून आली. घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत पुढील चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा केला जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी दिली.

मृत प्रियंकावर रायफलने गोळी झाडण्यात आली तेव्हा ती गरोदर असल्याची माहिती पुढे येत आहे. यावर पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नसून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर ही बाब स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. नेमके कारण कुटुंबीय आल्यावर काही मिळते का, या प्रतीक्षेत पोलिस आहेत. कुटुंबीयांना घटनेची महिती देण्यात आली आहे.

Title: pulgaon wardha soldier fire case news
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे