गडचिरोलीत आदीवासी समाजाला आपलेसे वाटणारा "वर्दीतला साहेब"

गडचिरोलीत पोलीस खात्यात काम करताना प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात.अतिदुर्गम भागात काम करणं तसं अवघडच परंतु तरीही समाजातील लोकांमध्ये सौहार्दाची भुमिका ठेवली अन आपलेपणा म्हणुन कार्य केले तर तो समाज कधीच विसरत नाही याचा अनुभव गडचिरोली जिल्हयात काम करताना आला.याबाबत गडचिरोली जिल्हयात तीन वर्षे काम केल्यानंतर आलेले सुखद अनुभव पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी शेअर केले आहे.

गडचिरोलीत पोलीस खात्यात काम करताना प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात.अतिदुर्गम भागात काम करणं तसं अवघडच परंतु तरीही समाजातील लोकांमध्ये सौहार्दाची भुमिका ठेवली अन आपलेपणा म्हणुन कार्य केले तर तो समाज कधीच विसरत नाही याचा अनुभव गडचिरोली जिल्हयात काम करताना आला.याबाबत गडचिरोली जिल्हयात तीन वर्षे काम केल्यानंतर आलेले सुखद अनुभव पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी शेअर केले आहे.

पोलीस खात्यात जायचंच या स्वप्नाने लहानपणापासुन पछाडले होते.अन त्या दृष्टीने अभ्यास करत स्पर्धा परिक्षा दिली.अन चांगल्या मार्कांनी पास होत पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणुन निवड झाली.हि निवड झाल्यानंतर नाशिकला पोलीस प्रशिक्षण पुर्ण केले.अन प्रथमच गडचिरोली जिल्हयात भामरागड तालुक्यात धोंडराज औटपोस्ट पोलीस मदत केंद्रात नियुक्ती झाली.ना कसला अनुभव ना फारसी माहिती.पुर्वीपासुन जे ऐकलं होतं त्यामुळे साहजिकच मनात थोडीसी भिती होती.माञ तरीही धाडस म्हणुन सहका-यांसोबत कामाला सुरुवात केली.या ठिकाणी नक्षलवादी विरोधात अभियान राबवताना वरिष्ठांचे मार्गदर्शन होतेच त्यामुळे प्रथम जनतेत आपुलकी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले.प्रथम समस्या जाणुन घेउन त्या कशा सोडवता येतील त्यावर भर दिला.ज्या गावात जाइल तेथील नागरिकांच्या समस्या जाणुन घ्यायच्या अन त्या त्या विभागामार्फत कशा सोडवता येतील याचा प्रयत्न केला.भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी शिक्षणापासुन मुलं प्रवाहाबाहेर होती त्यांना शिक्षणासाठी उद्युक्त केले.अनेकांना दुर्गम भागात राहत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे अनेकांना बाहेरच्या जगाची माहिती नव्हती.त्यांना पुणे,मुंबई आदी शहरांतील प्रमुख ठिकाणांची सहल पोलीस व आदिवासी विभागाच्या मार्फत घडवुन आणली.पुण्यात आणल्यानंतर गड,किल्ले यांचीही ओळख करुन महाराष्ट्र दर्शन यानिमित्ताने घडवुन आणले. मोठ्या गावांच्या ठिकाणी अनेक जनजागरण मेळावे आयोजित केले जायचे माञ अतिदुर्गम भागातील नेलगुंडा या छोट्याशा गावात जनजागरण मेळावा आयोजित करणे म्हणजे अत्यंत अवघड परंतु त्या ठिकाणी सेवेत असताना आदीवासी जमातीतील सर्व समाजांना एकञित आणुन सर्वात मोठा मेळावा आयोजित करण्यात आला."रेला नृत्य" हा तेथील अत्यंत लोकप्रिय नृत्यप्रकार या प्रकारच्या डान्स च्या कार्यक्रमासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले.त्यामुळेच अनेक आदिवासी समाजाला अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न केला.

  नेलगुंडा  या अतिदुर्गम भागात सर्व योजना व माहितीसाठी सर्वात मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळीस हजार ते बाराशे आदिवासी या मेळाव्यास हजर होते. पावसाळयात अतिदर्गम भागातील दोन गावांना जोडणा-या एका रस्त्यावर पुल नसल्याने अनेकदा आदिवासींचा संपर्क तुटल्याने गैरसोय व्हायची हि बाब लक्षात घेत पोलीस खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी,तसेच काही ग्रामस्थांना एकञ करत जुहीनाल्यावर पुलाची बांधणी केली.अन पावसाळ्यातील आदिवासी बांधवांची ससेहोलपट थांबवली.या भागात असलेल्या समाजाला नक्षलावादापासुन दुर ठेवणे हे एकच ध्येय असल्याने अनेकांच्या गावात जाउन समस्यांचे निराकरण व समाजाभिमुख काम केले.त्याचाच परिणाम म्हणुन त्या समाजातील अनेक चांगले अनुभव येत होते.

असाच एक प्रसंग.पोलीस मदत केंद्रापासुन काही अंतरावर असलेल्या एका गावातील नक्षलवादी महिलेचा चकमकीत मृत्यु झालेला.ही घटना घडुन काही दिवस झाले होते परंतु पोस्टमार्टेम करुन सापडलेला मृतदेह हा त्या कुटुंबियांच्या ताब्यात देणे गरजेचे होते.त्या पुर्वी हि घटना संबंधित कुटुंबाला सांगणे गरजेचे होते.मयत नक्षली महिलेचे वय अगदी कमी २०-२२ वर्षांचे असेल.हि घटना कशी सांगायची हा मोठा प्रश्न उभा राहिलेला.परंतु तरीही धारिष्ठ्य करुन मी शेजारच्या गावी निघालो.त्या कुटुंबातील सदस्यांशी चांगला संपर्क होता.त्यामुळे मोजक्या दोन सहका-यांना घेउन त्या गावी गेलो.त्या कुटुंबाच्या घरी गेलो.इतक्या दिवस त्या कुटुंबाने मुलगी नसल्याचे सांगत होते माञ हि मुलगी त्याच कुटुंबाची असल्याची माहिती पक्की असल्याने घरातील सदस्यांना सर्व समजावुन सांगितले.अन अत्यंत दुर्गंधी येत असलेली मयत मुलीची बॉडी प्लास्टिक मध्ये गुंडाळुन त्या कुटुंबाच्या सदस्यांच्या ताब्यात दिली तसेच अंत्यसंस्कारालाही काही खर्च दिला.याच ठिकाणी जीव धोक्यात असतानाही केवळ चांगला संपर्क असल्याने त्या कुटुंबाचा विश्वास संपादन करता आला व सर्व सोपस्कार पार पाडले अन कर्तव्य बजावत आले.

दिवाळी हा तसा सर्वांचा आवडता सण.या भागातील गरीब आदिवासी समाजालाही आनंदाचे क्षण मिळावे या हेतुने नवीन कपडे, मुलांना मिठाई आवर्जुन वाटप करायचो त्या मुळे या ठिकाणी काम करताना नेहमी आनंदच वाटायचा.कोणत्याही कामाचे दडपण वाटत नसे.त्यामुळेच या भागातील एकही व्यक्ती नक्षलवादी गटात सामिल झाला नाही. त्याचबरोबर माझ्या कार्यकालात मोठी चकमक घडलीच नाही.त्यामुळेच गोरे साहेब म्हणुन ख्याती असलेल्या पोलीसाला सर्व समाज बांधवांना आपुलकी वाटत असे.

गडचिरोली पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे यांचे मुळ गाव नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे हे गाव.सुरुवातीपासुन एकञ कुटुंब पद्धतीत मोठे झालेल्या पालवे यांनी हे पोलीस खात्यातील यशाचे सर्व श्रेय आई सुनंदा व वडील जगन्नाथ पालवे यांना दिले असुन सध्या ते पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत.पालवे यांनी आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारे विशेष सेवा पदक तसेच केंद्र सरकाच्या वतीने देण्यात येणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक देउन त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

Title: psipalwe good work in gadchiroli district
प्रतिक्रिया (8)
 
विकास महाजन
Posted on 30 June, 2020

पालवे साहेब तुम्ही खुप छान काम केले आहे .....

महेश मुरलिधर शिरसाट
Posted on 29 June, 2020

पालवे सर आपले कार्यचा खरोखर समाजाला आदर्श आहे.असेच प्रेरणादायी काम आपल्या हातून होओ. आपल्याला मिलालेल ्या पूरस्काराबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा

श्री बाबासाहेब भागीनाथ दौंड
Posted on 29 June, 2020

आदरणीय श्री भगवानराव पालवे साहेब , आदिवासी समाजासाठी आपण केलेले कार्य खरोखर उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे .आपल्या सारखे प्रामाणिक , कर्तबगार , शिस्तप्रिय व सर्वसामान्य ऊसतोड मजूर , आदिवासी , वंचित घटक आणि गरिबासाठी झटत असलेला खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी पाहून मन भारावून जाते . साहेब आपल्या कार्यास शुभे

BORHUDE RAJENDRA
Posted on 28 June, 2020

great work for Maharashtra state.n Adivashi people. wishing you all the best for future service.

Uchale Supriya sayaji
Posted on 28 June, 2020

Vryy very good working sir.....no words😊

Uchale Supriya sayaji
Posted on 28 June, 2020

Vryy very good working sir.....no words😊

Swapnil Temgire
Posted on 28 June, 2020

साहेब तुम्ही करीत असलेली कार्य खुप चांगले आहे.

Swapnil Temgire
Posted on 28 June, 2020

साहेब तुम्ही करीत असलेली कार्य खुप चांगले आहे.

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे