आमच्या पोलिसकाकांचा वाढदिवस...

वाढदिवस म्हणजे आनंदी आनंद. शुभेच्छा, भेटींचा वर्षाव. एक क्षणभर दिवसाचा हर्ष प्रफुल्लीत, उत्साहाचा परामर्ष. वाढदिवस म्हणजे जन्मापासून आजतागायत प्रत्येक क्षणांची कटू, गोड, गोळा बेरीज. सुखी व दुखी क्षणांची आठवण.

वाढदिवस म्हणजे आनंदी आनंद. शुभेच्छा, भेटींचा वर्षाव. एक क्षणभर दिवसाचा हर्ष प्रफुल्लीत, उत्साहाचा परामर्ष. वाढदिवस म्हणजे जन्मापासून आजतागायत प्रत्येक क्षणांची कटू, गोड, गोळा बेरीज. सुखी व दुखी क्षणांची आठवण. वाढदिवस म्हणजे त्या दिवशी नातेवाईक, मित्रपरिवाराने केलेला शुभेच्छांचा वर्षाव. आणि वाढदिवस म्हणजे त्या दिवशी आपली झालेली गोड आठवण.

लहान-थोरांपासून अनेकजण वाढदिवस साजरा करताना दिसतात. पण, आमचे पोलिसकाका वाढदिवशीही जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटताना दिसतात. कुटुंबापासून दूर असतात किंवा कुटुंबियांच्या वाढदिवसावेळी त्यांना सहभागी होता येत नाही. कारण, त्यांनी जनतेच्या सेवेचे व्रत घेतले आहे. पण, www.policekaka.com या वेबसाईटवरून पोलिसकाकांचे वाढदिवस आवर्जून साजरे केले जाणार आहेत. शिवाय, वाढदिवशी पोलिसकाकांचे फोटो फेसबुक पेजवरून शेअर केले जाणार आहेत. कारण, आम्ही आमच्या पोलिसकाकांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. www.policekaka.com म्हणजे पोलिस बलासाठी वाहून घेतलेली वेबसाईट. लवकरच आपल्या सेवेत येत आहेत. पण, वाढदिवस तर साजरे होणारच. त्यासाठी आपले छायाचित्र, जन्मतारीख आम्हाला पाठविल्यास आपला वाढदिवस साजरा करता येईल. यामुळे आपला आनंद नक्कीच द्विगुणीत होईल, अशी आशा आम्ही बाळगतो.

आपली माहिती पाठवा...
editor@policekaka.com अथवा 88050 45495 या क्रमांकावर जरूर पाठवा.

धन्यवाद!!!
टीम पोलिसकाका

Title: policekaka website celebrate police birthday on website
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे