हंबरडा फोडणा-या जनावरांचा टाहो पोलीसकाकांनी केला शांत

अहमदनगर : घरी कोणी नसताना हंबरडा फोडणा-या जनावरांचा टाहो पोलीसांनी चारा कापुन जनावरांना खाउ घालत शांत केला.टाळेबंदीत पोलीसकाकांनी या माध्यमातुन माणुसकीचे दर्शन घडविले.

अहमदनगर : घरी कोणी नसताना हंबरडा फोडणा-या जनावरांचा टाहो पोलीसांनी चारा कापुन जनावरांना खाउ घालत शांत केला.टाळेबंदीत पोलीसकाकांनी या माध्यमातुन माणुसकीचे दर्शन घडविले.

राज्यात टाळेबंदी सुरु असताना अनेक ठिकाणी पोलीस बांधव प्रतिकुल परिस्थितीत कर्तव्य बजावत आहेत. त्यात अहमदनगर  जिल्हयातील नेवासे तालुक्यातील तेलकुडगावातील शेतवस्तीवर एका महिलेचा मृतदेह आढळुन आला होता.यावेळी संबंधित घरातील सदस्यांवर गुन्हा दाखल होताच घरातील सर्व सदस्य फरार झाले होते.घरी कोणीच नसल्याने घरी जनावरांचा केवळ मोठ्याने हंबरडा सुरु होता.यावेळी घरी तपासासाठी आलेल्या पोलीसांच्या पथकाला जनावरांच्या टाहो कानी आला.यावेळी पोलीस पथकातील भिमराज पवार,अंबादास गिते या दोन बहादुर कर्मचा-यांनी हाती थेट कोयता घेत शेजारील शेतातुन घास/चारा कापुन आणत  भुकेल्या जनावरांना खाउ घातला.तसेच पाणीही पाजले.यावेळी जोपर्यंत घरी कोणी येत नाही तोपर्यंत घरी जनावरांना चारा,पाणी करण्याची जबाबदारी ही घेतली.

पोलीस खात्यात असुनही शेतकरी पुञ असलेल्या वर्दीतील या दोन्हीही कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-यांचे या कार्याबद्दल सर्वञ कौतुक होत आहे.

 

Title: policekak cut the grass when not anyone home
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे