जीव धोक्यात घालुन पोलिसकाकांनी वाचविले त्यांचे प्राण

शिक्रापूर : परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातलेले असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी जीव धोक्यात घालुन युवकांची पुराच्या पाण्यातुन सुटका केली असुन पोलिसच ख-या अर्थाने देव म्हणुन धावुन आले आहेत.

शिक्रापूर : परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातलेले असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी जीव धोक्यात घालुन युवकांची पुराच्या पाण्यातुन सुटका केली असुन पोलिसच ख-या अर्थाने देव म्हणुन धावुन आले आहेत.

याबाबत सविस्तर असे कि,पुणे जिल्हयातील शिक्रापूर येथे रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व ओढ्या नाल्यांना पूर आलेला होता.यावेळी शिक्रापूर येथील ओरा सिटी लगतच्या ओढ्याला देखील मोठा पूर आला.यावेळी येथील पुरातून एम.एच १४ बि. आर ४६४४ ही स्विफ्ट कार वाहून जाऊन पुराच्या मध्यभागी झाडाला अडकली आणि कार मधील दोघे मोठ्याने ओरडा करू लागले.यावेळी शेजारील नागरिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार अनिल जगताप व संतोष शिंदे यांना माहिती दिली असता तातडीने पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस हवालदार संजय ढमाळ, पोलीस शिपाई लक्ष्मण शिरसकर, मनोहर पुंडे, योगेश बधे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी पोलीस हवालदार संजय ढमाळ, होमगार्ड मनोहर पुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता ओढ्याच्या पुराच्या पाण्यात उडी घेतली त्यांनतर दोरीच्या सहाय्याने पाण्यामध्ये अडकलेल्या युवकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले.यावेळी पाण्याचा वेग इतका होता कि पोलिसांना देखील धोका पोहचू शकला असता मात्र पोलिसांनी व होमगार्डच्या जवानांनी कसलीही पर्वा न करता पाण्यातील दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आणि तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्यातील दोघांना बाहेर काढण्यात आले.यावेळी पोलिसांनी अनुकुमार विश्वनाथ जाधव रा. हिवरे रोड शिक्रापूर व निसार करीम शेख या दोघांना जीवदान देत पाण्यातून बाहेर काढले.शिक्रापुर पोलिस व होमगार्डच्या जवानाचे सर्वञ कौतुक केले जात आहे.

Title: Police rescued his life at the risk of his life
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे