खाकी वर्दीत भेटला मजला माझा पांडुरंग

विठ्ठल जळी स्थळी भरला...रिता  ठाव नाही उरला...

पंढरपूर मध्ये वारकरी दाखल होत असल्याने प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे.पंढरपूर मध्ये आलेल्या एका वारकऱ्याला आपला पोलिस बांधव जेव्हा वारीबाबत समजून सांगत आहेत.तेव्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या वारकऱ्याला ही साक्षात पांडुरंगाचे दर्शन भेटल्यानंतरच्या भावना या वारकऱ्याला मनात दाटून येतात

पंढरपूर : राज्यावर कोरोनाचे संकट आले अन लॉक डाऊन सुरू झाले.त्यानंतर  सगळीच धार्मिक स्थळे बंद करण्यात आली.आपले मराठी नववर्ष हे सुरू होते ते गुढी पाडव्याच्या सणाने मात्र तोही सण सगळ्यांनी घरीच साजरा केला.त्यानंतर आलेला मुस्लिम बांधवांचा रमजान ईद.परंतु तो ही सण अत्यंत साधेपणाने सगळीकडे साजरा करण्यात आला.तब्बल चार महिने आपले पोलिस बांधव हे कोरोना च्या या संकटात अहोरात्र बंदोबस्त करत कर्तव्य बजावत आहे.आषाढी एकादशी निमित्त अनेक गावोगावी दिंड्या,पताका घेऊन राज्यातील अनेक पालख्या या पंढरपूरला जात असतात.मात्र कोरोनाचे संकट गडद असल्याने या वर्षी वारी सोहळा मात्र होऊ शकणार नाही.

पंढरपूर मध्ये वारकरी दाखल होत असल्याने प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे.पंढरपूर मध्ये आलेल्या एका वारकऱ्याला  आपला पोलिस बांधव जेव्हा वारीबाबत समजून सांगत आहेत.तेव्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या वारकऱ्याला ही साक्षात पांडुरंगाचे दर्शन भेटल्यानंतरच्या भावना या वारकऱ्याला मनात दाटून येतात.आज व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर  अनेक नागरिक व पोलिस बांधवांच्या फेसबुक अन् व्हॉटसअप स्टेट्स ला दिसून येत आहे.

Title: police and varkari video goes on viral social media
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे