पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड यांची संघर्षमय यशोगाथा...

पाथरी पोलिस येथे कार्यरत असतांना त्यांचाच सोबत कार्यरत महिला पोलिस कर्मचारी राखी गेडाम या स्पर्धा परिक्षेची तयारी करत होत्या. त्यातूनच यांना सुध्दा वाचनाची आवड निर्माण झाली व आपनही स्पर्धा परीक्षा द्यावी, असे वाटू लागले. पण...

माधुरी यांचा जन्म चंद्रपूर येथील. त्यांचे वडील शंकरराव गायकवाड हे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात. ब्रह्मपुरी पोलिस ठाणे येथे हवालदार या पदावर वडील कार्यरत होते. त्यामुळे पोलिस खात्यासंबंधी आवड होतीच. माधुरी या शालेय स्तरातील राष्ट्रीय बास्केटबॉलपटू. खेळातच प्राविण्य प्राप्त करायचे व त्यातूनच नोकरी मिळवायची, असे मनांत ठरविले. कुटुंबात एकूण सात सदस्य. आई-वडील एक मोठी बहीण व तीन लहान बहिणी.

माधुरी या दहावीच्या वर्गात असताना वडिलांचे निधन झाले. यानंतर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी माधुरी यांच्यावर आली. पण, त्यांचे एकच ध्येय होते ते म्हणजे नोकरी करायची व संसाराचा गाडा चालवायचा. या विवंचनेत असताना सन २००६ साली वयाच्या १९ व्या वर्षी त्यांची चंद्रपुर जिल्हा पोलिस दलात महिला पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती झाली.

एकच ध्यास:  
पोलिस खात्यात भरती झाल्यानंतर त्यांचे एकच लक्ष होते की, आपल्या लहान बहीणींना शिकवून चांगल्या पदावर पोहचविणे. नऊ महिन्यांच्या खंडाळा येथील प्रशिक्षणानंतर त्यांची बदली चंद्रपुर जिल्ह्यातील पाथरी  पोलिस स्टेशन येथे झाली. त्यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले व त्या पदवीधर झाल्या. भुगोल व समाजशास्त्र या विषयात उच्च पदवीधर (M A) झाल्या.

खरा प्रेरणास्त्रोत:
पाथरी पोलिस येथे कार्यरत असतांना त्यांचाच सोबत कार्यरत महिला पोलिस कर्मचारी राखी गेडाम या स्पर्धा परिक्षेची तयारी करत होत्या. त्यातूनच यांना सुध्दा वाचनाची आवड निर्माण झाली व आपनही स्पर्धा परीक्षा द्यावी, असे वाटू लागले. पण, घरची परिस्थिती अनुकुल नव्हती. राखी गेडाम यांची पोलिस उपनिरीक्षक पदी झालेली निवड व त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे कुठल्याही प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे वर्ग न लावता सन २०११ साली माधुरी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( MPSC) ची पुर्व परीक्षा दिली व उत्तीर्ण झाल्या. या परीक्षेत माधुरी ह्या अनुसुचीत गटामधे ७ व्या गुणवत्ता धारक होत्या.
 
पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रवास सुरू:
सन २०१२ ॲाक्टोबर मध्ये माधुरी गायकवाड या पुढील प्रशिक्षणासाठी नाशिक पोलिस प्रशिक्षण केंद्रात दाखल झाल्या. वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती परीविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक या पदावर अकोला जिल्हा पोलिस दलात झाली. सहा महीन्यांचा परीविक्षाधिन कालावधी संपताच त्यांनी सिव्हील लाईन पोलिस ठाणे, गुन्हे अन्वेषण विभाग, दामीनी पथक या जबाबदार्या उत्कुष्टरित्या पार पाडल्या.

विशेष उल्लेखनीय कामगिरी:
अकोला येथे कार्यरत असतांना येथीलच नवोदय विद्यालयातल्या मुलींवर शारीरिक शिक्षकाद्वारे होत असलेल्या लैंगिक अत्याचाराचा तपास यशस्वीरित्या पार पाडला. २०१३ ते २०१७ या ४ वर्षानंतर त्यांची बदली वर्धा जिल्हा पोलिस दलात व तेथूनच त्यांची नेमणूक समुद्रपुर पोलिस ठाणे येथे झाली. तेथे पोलिस अधिक्षक वर्धा यांचेद्वारे हिंगणघाट पोलिस उपविभागातील बाल लैगिक गुन्ह्यातील तपास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली व त्यांनीही हि जबाबदारी उत्कुष्टरित्या पार पाडली.

ईच्छा,आकाक्षा व यश:
पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड यांना एकदातरी मुंबई  पोलिसात काम करायचे आहे.
माधुरी गायकवाड यांनी  पोलिस खात्याअंतर्गत होणाऱया राष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल सामन्यांत नागपूर परीक्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले आहे.
“न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱयांसमोर कधी-कधी नशीब सुध्दा हरते”

दरम्यान, माधुरी शंकरराव गायकवाड यांनी बिकट परीस्थितीशी सामना करुन आपले ध्येय गाठले आहे. लढवय्या महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड यांना पोलिसकाका टीमकडून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐

कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे याची यशोगाथा...

Title: pis madhur shankarrao gaikwad succes story on policekaka
प्रतिक्रिया (14)
 
Kirti Mishra
Posted on 2 September, 2020

Seriously I feel so proud that m attached with this person... U r such an inspiration to all.. Proud of uh Mam👍👍👍👍 God bless uh always...

priyanka kawale
Posted on 30 August, 2020

ताई खूप छान असेच उत्तमाेत्तम कामगिरी तूझ्या हातून होउदे तूझ्या सर्वच ईच्छा आकांक्षा पूर्ण होऊदे..

शुभांगी गणवीर
Posted on 30 August, 2020

आमच्या सोबतच म्हणजे आमच्या सिनियर होत्या माधुरी ताई.. NCC मध्ये कॅप्टन आणि नेहमी तत्पर पुढे राहायची ताई.. तिच्याकडे बघून नेहमी वाटायचं नक्की काहीतरी करणार.. एवढी कहाणी तिची माहीत नव्हती पण आज माहीत झालं.. proud of you माधुरी ताई.. अशीच नेहमी यशस्वी होत रहा.. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा

Prakash Shankarji Patre
Posted on 30 August, 2020

खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन 💐 I AM Very Very Proud of You Madhuri Best Of luck For Your Bright Futures

Amol moreshwar nannaware
Posted on 30 August, 2020

तुमच्या जीवनाची अप्रतिम यशस्वी वाटचाल आमच्या येणाऱ्या पिढीला एक प्रेरणा देणार तुमचं उत्तुंग व्यक्तिमत्व तुमच्या भावी वाटचालीस खूप खुप शुभेच्छा... 🙏

Sanket Gaikwad
Posted on 30 August, 2020

We are proud of you Tai 🙌!!! May your story helps our young generation to be courageous and dedicated towards their goal. You are the real inspiration of women empowerment. Best Wishes 👍 for your upcoming success... God Bless You 😇

Ujwala salampure
Posted on 29 August, 2020

Proud of u madam ..best of luck for nxt exam

Dipti gaikwad
Posted on 29 August, 2020

Jo aasani se mil jata he ,wo hamesha tak nhi rahta.. jo hamesha tak rahta he ,aur wo aasani se nhi milata... Proud of you tai💐💐💐💐💐👍

Kk
Posted on 29 August, 2020

One of the best heroes of our nation. Thanks for inspiring everyone always from your hardwork mam

Sakshi jaykishor more
Posted on 29 August, 2020

Khrch khup prernadai pravas ahe mam tumcha. Manasala pristhiti ani manachi jidd sgl kahi shikun jate ani yach don gostinmule aapl jivan sukhdai hot .i am very very proud of you mam.best of luck for your bright future.💐💐💐💐

Prachi j. More
Posted on 29 August, 2020

Nanhi chiti jab dana lekar chalti hai, Chadhti divaro pr, 100 bar fisalti hai ! Man ka vishvas rago me sans bharta hai, Chadhakar girna, girkar chadhna n akhrta hai! Akhir uski mehant bekar nhi hoti koshish Karne valo ki kabhi har nhi hoti🙏🙏🙏 Proud of you tai😊

निशा शंकर गायकवाड
Posted on 29 August, 2020

असफलता एक चुनौती है,स्वीकार करो क्या कमी रह गई, देखो और सुधार करो जब तक न हो, नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम कुछ किये बिना हि जय जय कार नही होती कोशिश करने वालो की हार नही होती !👍 Tai tuzya ya kelelya karyala salam maza.🙏🙏

Nikhil
Posted on 29 August, 2020

Great Madam

Madhuri gaikawad
Posted on 29 August, 2020

माझ्या संघर्षमय यशोगाथा ला आपण आपल्या लेखणीतून उजाळा दिल्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे आपण केलेल्या कार्याची कुठेतरी दखल घेण्यात आली याचा नक्कीच आनंद आहे आणि यातूनच पुढे भविष्यात आपल्या हातून नेहमी चांगले काम होईल यासाठी नक्कीच प्रेरणा मिळाली धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे