कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

मुळची कुस्तीची आवड.हिच आवड पुढे आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.कुस्ती क्षेञातुन पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असलेले डॅशिंग परंतु तितकेच संवेदनशील अधिकारी म्हणुन ओळख असलेल्या लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांची पोलिस दलातील प्रेरणादायी कहाणी...

मुळची कुस्तीची आवड.हिच आवड पुढे आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कुस्ती क्षेञातुन पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असलेले डॅशिंग परंतु तितकेच संवेदनशील अधिकारी म्हणुन ओळख असलेल्या लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांची पोलिस दलातील प्रेरणादायी कहाणी...

बालपणापासुनच कुस्तीचं वेड
पुणे शहरात बालपण गेलेल्या मानकर यांना कुस्तीचा वारसा आला तो वडील विठोबा मानकर यांच्याकडून. वडील हे तालमीत वस्ताद असल्याने वडीलांसोबत लहानपणापासुनच प्रताप हे तालमीत जायचे. अगदी बालपणापासुनच सकस आहार अन तालमीत व्यायामाचे वेड लागले. व्यायाम करत वाढत्या वयाला ख-या अर्थाने आकार मिळू लागला होता. व्यायाम सुरु असतानाच पुण्यातील भावे प्राथमिक शाळेत शिक्षण सुरु होते. शिक्षणात अभ्यासाची गोडी निर्माण झाली. चांगले मार्कही मिळत होते. भावे हायस्कुल मध्ये माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण स.प.माविद्यालयात घेतले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना आंतरशालेय विविध खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेउ लागलो. त्यात नेहमीच कुस्तीची आवड असल्याने चांगले क्रमांक पटकाविता आले. अनेक बक्षिसे मिळवत राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. या ठिकाणीही चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत चुणूक दाखवली. शालेय तसेच विदयापीठ स्पर्धा, राज्य-राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांध्ये चमक दाखविली.

अन पोलिस खात्यात भरती झालो
पुण्यातील देवळाची तालीम येथे कुस्तीचा सराव सुरु असतानाच अभ्यासाकडेही सातत्याने लक्ष ठेवले. कधीही दुर्लक्ष होउ दिले नाही. दरम्यान सन १९९१ पासुनच स्पर्धा परिक्षांचीही तयारी सुरु केली होती. सन १९९२ साली पोलीस भरतीसाठी जाहिरात आल्याने परिक्षा देण्याचे ठरवले अन परिक्षाही दिली. यावेळी पहिल्याच प्रयत्नात चांगले घवघवीत यश मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. सन १९९३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस खात्यात भरती झालो.

चांगल्या कामाचा ठसा
पोलिस खात्यात प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर मुंबईत डोंगरी पोलिस स्टेशनला नेमणुक झाली. या ठिकाणी कामाचा अनुभव घेत असताना विविध विभागातही सातत्याने कामाचा अनुभव घेता आला. स्पेशल प्रोटेक्शन युनिट त्याचबरोबर अनेक मंञ्यांच्या व्हिआयपी बंदोबस्ताची जबाबदारी असायची. ती ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत असताना वडगाव मावळ, कामशेत, तळेगाव दाभाडे, आळंदी या महत्वाच्या पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणून चांगल्या प्रकारे काम करता आले. पुणे ग्रामीण ला काम केल्यानंतर साता-यातील कोरेगाव पोलिस स्टेशन, ठाणे ग्रामीण, बदलापुर, पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज, ठाणे शहर,सांगलीतील इस्लामपूर आदी ठिकाणी पोलिस सेवेत काम करताना चांगल्या प्रकारे सर्वसामान्यांना न्याय देता आला.

गुन्हेगारांवर कडक वचक
पोलिस खात्यात काम करत असताना गुन्हे शाखेत कर्तव्य बजावत असताना नामचिन गुंडांना तडीपार करता आले. त्याचबरोबर खुन, दरोडे, खंडणीखोर यांचा अल्पवाधीत तपास करत आरोपींना गजाआड़ करण्यात यश आले. चो-या तसेच अनेक गुन्हयांना प्रतिबंध घालता आले. कामशेत पोलीस स्टेशनला कार्यरत असताना पुणे-मुंबई महामार्गावर सातत्याने नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत होत्या. या वेळी अत्यंत प्रभावी उपाययोजना राबवत सर्व गुन्हे घडकिस आणत या परिसरात होणा-या लुटमारीच्या घटना कायमच्या थांबण्यात यश आले होते. पुणे ग्रामीणला काम करत असताना खुनाचे गंभीर गुन्हे उघडकिस आनता आले. ठाणे ग्रामीण पोलिस दलात गुन्हे शाखेत कार्यरत असताना कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारांना वठणीवर आणत असताना एकदा चकमकीत सहभाग घेता आला.

जनतेला वर्दीचं निर्माण झालं आकर्षण
सांगली जिल्हयात इस्लामपूर येथे काम करत असताना सुरुवातीला तणावाच्या वातावरणात काम करावे लागायचे.माञ थेट जनतेशी मिसळून काम करण्याची पद्धत असल्याने अल्पावधीत लोकांना आपलेसे करता आले. त्यामुळे नागरिकांना पोलीसांची आदरयुक्त भिती निर्माण झाली.अनेक नागरिकांना पोलिसांविषयी आपुलकी वाटत असे. कॉलेज मधील युवक युवती यांना सातत्याने मार्गदर्शन व प्रबोधन केल्याने तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळत होती. त्याचबरोबर महिला व मुलींच्या बाबतीत तत्काळ मदत मिळत असल्याने अनेक गैरप्रकारांवर आळा घालता आला. पोलिस हेच खरे जनतेचे रक्षक आहे हे ख-या अर्थाने काळात सिद्ध झाले.

कोरेगाव भीमाचा चोख बंदोबस्त
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे दंगलीच्या पार्श्वभूमीवर अतिशय संवेदनशील बनलेल्या या परिसरात लोणीकंद पोलिस स्टेशनचाही बंदोबस्त असतो. त्यामुळे या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर दंगलीनंतर कायदा व सुव्यवस्था राखणे, स्थिती पुर्वपदावर आणने हे गरजेचे होते. माञ, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सलग दोन वर्षे एक जानेवारीला पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजन करुन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत, या बंदोबस्ताची जबाबदारी चांगली हाताळली. त्यांच्या या कामाची दखल घेत वरिष्ठांनी कौतुक केले.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला
लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत पुणे नगर महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. माञ, यावर स्थानिकांना विचारात घेत सर्वांच्या सहकार्याने यावर उपाययोजना करत वाहतूक कोंडी सोडविण्यात मानकर यांना यश आले. त्यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्या या निर्णयाचे मोठे कौतूक केले.

कोरोनाच्या संकटात गोरगरिबांना भरीव मदत
पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असताना नेहमीच सामाजिक उपक्रम राबविणारा खाकीतील संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मानकर यांनी कोरोनाच्या संकटात अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. लॉक डाउन काळात लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या प्रत्येक निर्वासिताची राहण्याची व्यवस्था तसेच जेवणाची संपूर्ण व्यवस्था अतिशय काटेकोरपणे त्यांनी पाहिली. सुमारे २० हजार लोकांना मुळगावी जाण्यासाठी त्यांना मदत केली. त्याचबरोबर प्रत्येक गरजुना विविध प्रकारे मदत देऊ केली. लॉक डाउन काळात सामाजिक भावनेतुन सहकारी कर्मचारी यांच्या मदतीने सहा ते सात हजार जीवनावश्यक वस्तुंचे किट घरपोच देण्यात आले. ज्यांची चुल पेटली नसती त्यांना ख-या अर्थाने  गरीबाच्या घरी मदत देउन चेह-यावर हास्य फुलवले आहे. पोलिस हा पारधी वस्तीवर नेहमी आरोपी पकडायला जात असतो त्यामुळे अनेकांना नेहमी पोलिसांची भिती वाटत असते. त्याचबरोबर हा गैरसमज आजही समाजात असताना हे सर्व खोटे ठरवत प्रथमच प्रत्येक समाजातील घटकांना विशेषत: समाजापासून लांब राहणा-या पारधी समाजाला वस्तीवर जाऊन केवळ जीवनावश्यकच नाही तर सर्वप्रकारची मदत देउन सामाजिक बांधिलकी जपली आहे. रमजान काळात अनेक मुस्लिम बांधवांना उपवासाचे किट घरपोच देत नागरिकांची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी मानकर यांनी घेतली.

वर्दीत दडलेला संवेदनशील अधिकारी
डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित असलेल्या मानकर यांची वर्दीत दडलेला संवेदनशील अधिकारी अशीही ओळख आहे. पोलिस खात्यात काम करत असताना कुस्तीवरील प्रेम माञ त्यांनी कमी केले नसून खेळासाठी नवतरुणांना सातत्याने मानकर हे प्रोत्साहन देत आहेत.पोलिस खात्यात उच्चशिक्षित तरुणांनी आल्यास चांगल्या धडाडीला वाव मिळू शकतो. त्याचबरोबर तांञिक ज्ञान असलेल्या तरुणांनी पोलिस भरतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.

Title: pi pratap mankar success story in police department
प्रतिक्रिया (7)
 
Santosh
Posted on 22 July, 2020

सरांचे बोलणे एकदम सभ्य आहे. पोलिस दलामध्ये असे अधिकारी दुर्मिळ आहेत. सरांना मानाचा मुजरा...

संतोष कदम ,गाव- मसुचिवाडी ,ता वाळवा,जि सांगली
Posted on 22 July, 2020

आमचे साहेब नाही तर आपले ,आपल्या सर्वांचे मार्गदर्शक साहेब म्हणजेच प्रताप मानकर साहेब.साहेब इस्लामपूर जि सांगली या पोलीस स्टेशन चे अधिकारी असताना साहेबानी अतिशय उत्कृष्ट काम केले लहानापासून थोरापर्यंत मानकर साहेब हे नाव सबंध तालुक्यात प्रसिद्ध झाले याचे कारण एकच सर्वसामान्य लोकांत मिसळून न्याय देणारे

कैलास बारगिर
Posted on 21 July, 2020

मानकर सरांचे कार्य कायमच उल्लेखनीय राहिले आहे सलाम तुमच्या कार्याला

गणेश दिगंबर कुऱ्हाडे
Posted on 21 July, 2020

अप्रतिम कार्य आहे मी खूपच जवळून पाहिलंय त्यांना काम करतांना आणि गोर गरिबांविषयी तर खूप तळ मळ मोठं मोठ्या अडचणीना अगदी सहज मात देतात

राजेंद्र रामचंद्र नातु.
Posted on 21 July, 2020

अतिशय सुरेख आणि वास्तव असणारं गुणवान, आदर्श व्यक्तीमत्व खाकी वर्दीतील असतात हे आदरनिय मानकर साहेबांनी आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडत असतानाच एक सहिष्णू आदर्श अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. हे पोलीस दलाचा नावलौकिक वाढवणारं आणि समाजात विश्वास आणि समाजसेवेची प्रेरणा देणारं काम आहे.

सदाशिव परबतराव गायकवाड
Posted on 20 July, 2020

Hero of Lonikand P. Stn. Very Nice. We are always Respect.

अॅड् प्रदीप बारवकर
Posted on 20 July, 2020

प्रेरणादायी जीवनप्रवास

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे