कराची स्टॉक एक्‍सचेंजवरील हल्ल्याचा Live थरार पाहा...

पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्‍सचेंजवर सोमवारी (ता. 29) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांसह नऊ जण ठार झाले आहेत. पण, हल्ल्याचा लाईव्ह थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गोळीबाराचे आवाज ऐकायला येत आहेत.

कराची : पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्‍सचेंजवर सोमवारी (ता. 29) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांसह नऊ जण ठार झाले आहेत. पण, हल्ल्याचा लाईव्ह थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गोळीबाराचे आवाज ऐकायला येत आहेत.

कराची स्टॉक एक्‍सचेंजच्या इमारतीवर हल्ला झाल्यानंतर एकाने मोबाईलवरून शुटींग सुरू केले. संबंधित व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, गोळीबार सुरू असल्याबरोबरच गोळ्यांचे आवाज येत आहेत. शिवाय, दहशतवादी इमारतीमध्ये प्रवेश करताना स्पष्टपणे दिसत आहे. दहशतवादी हल्ल्याचे शुटिंग करणारा बोलत असल्याचे ऐकायला मिळते. तो सांगत आहे की, 'सर मेरे सामने गोलियॉं चल रहीं है, अभी अंदर घुस गएँ है, सबको बता दे प्लीज.' दरम्यान, या हल्ल्यामध्ये चार दहशतवाद्यांसह पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Title: pakistan karachi stock exchange terror attack live video vir
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे