ऑनलाईन डेटिंग ज्येष्ठाला पडले महागात...

ऑनलाईन डेटिंग साईटवरुन मुली मागविणे ज्येष्ठ नागरिकास चांगलेच महागात पडले असुन सायबर चोरट्यांनी त्या ज्येष्ठास तब्बल पावणे चार लाख रुपयांना गंडा घातला आहे.

पुणे : ऑनलाईन डेटिंग साईटवरुन मुली मागविणे ज्येष्ठ नागरिकास चांगलेच महागात पडले असुन सायबर चोरट्यांनी त्या ज्येष्ठास तब्बल पावणे चार लाख रुपयांना गंडा घातला आहे.

याबाबत सविस्तर असे कि, फिर्यादी हे ज्येष्ठ असुन क्वार्टर गेट येथील घरी असताना त्यांना एक फोन आला. त्यांना डेटींगसाठी मुली पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना एका साईटवर ऑनलाईन रजिस्टेशन करायला सांगितले. त्यासाठी त्यांना एका बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. त्यांनी पैसे पाठविल्यानंतर त्यांना दुसऱ्या मोबाईल फोन वरुन संपर्क साधण्यात आला. तुम्ही आता रजिस्टेशन केले असल्याने तुमच्यावर पोलीस गुन्हा दाखल करतील, अशी भिती दाखवून हे रजिस्टेशन रद्द करायचा असेल तर आणखी पैसे पाठविण्यास भाग पडले.

अशाप्रकारे त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली जाऊ लागली. तेव्हा त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतले. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हा गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग केला आहे.

नागरिकांनी इंटरनेट सर्फिंग करताना व रजिस्ट्रेशन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Title: Online dating is expensive for seniors
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे