सराईत गुन्हेगाराकडुन जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल

पिंपरी चिंचवड : गेल्या काही वर्षांपासुन फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असुन आरोपीकडुन तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड : गेल्या काही वर्षांपासुन फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असुन आरोपीकडुन तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.(दि.20 सप्टेंबर) रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी निगडी येथील नावकर ज्वेलर्स मधून 20 किलो चांदीचे दागिने आणि 26 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

वाकड पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरु केला.निगडी येथील सराफ दुकानापासून काही अंतरावर एक इको कार संशयास्पद आढळली. त्यावरून पोलिसांनी त्या कारचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन इको कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी आपली शोधमोहीम पिंपरी-चिंचवड शहराच्या बाहेर खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात सुरु केली. तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून वाकड पोलिसांनी हे चोरीचे गुन्हे करत असलेल्या टोळीचा शोध लावला.सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि त्याची टोळी हे गुन्हे करत असून कल्याणी हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.कल्याणी हा दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या 41 गंभीर गुन्ह्यात अटक होता.तसेच त्याच्यावर आणखी 15 गंभीर गुन्हे दाखल होते. त्या 15 गुन्ह्यात कल्याणी हा फरार होता.

वाकड पोलिसांच्या तपास पथकाचे पोलीस नाईक प्रमोद कदम यांना माहिती मिळाली की, एका व्हेरना कारमधून आरोपी कल्याणी फिरत आहे.त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने सापळा लाऊन व्हेरना कार (एम एच 05 / ए एक्स 9376) सह आरोपी कल्याणी आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले.कारची पाहणी केली असता कल्याणी याच्या कारमध्ये दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला. तर कल्याणी याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली.त्याने वाकड रोडवरील पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची कबुली दिली.

पोलीस कोठडीत असताना अटक केलेल्या आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसोबत मिळून वाकड (5 गुन्हे), चिखली (5 गुन्हे), देहूरोड (3 गुन्हे), निगडी (6 गुन्हे), पिंपरी (3 गुन्हे), चिंचवड (2 गुन्हे), सांगवी (2 गुन्हे), भोसरी (2 गुन्हे), एमआयडीसी भोसरी (2 गुन्हे), हिंजवडी (1 गुन्हा), लोणी काळभोर (1 गुन्हा), लोणीकंद (1 गुन्हा), वालीव (1 गुन्हा) या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 34 गुन्हे केल्याचे सांगितले.त्या गुन्ह्यातील एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचे 750 ग्राम सोने, 100 किलो चांदी, तीन कार, एक पिस्टल, पाच काडतुसे, कटावण्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, जावेद पठाण, वजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

 

Title: One crore seized from Sarait criminals
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे