प्रेमविवाहानंतर चार दिवसातच आत्महत्या...

प्रेमविवाह केल्यानंतर चार दिवसानंतर नवदांपत्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन तर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली. मधून समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): प्रेमविवाह केल्यानंतर चार दिवसानंतर नवदांपत्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन तर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली. मधून समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विशाल आणि निशा असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल हा कविनगर पोलीस स्टेशन परिसरात कोचिंग क्लास घेत होता. चार वर्षापुर्वी त्याची ओळख निशासोबत झाली निशा एका मल्टी नॅशनल कंपनीत एच आर मॅनेजर म्हणून काम करत होती. चार वर्षाच्या प्रेमसंबधानंतर 29 जून रोजी कुटुंबियांच्या संमतीने दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर निशाने सासरच्या घरी पोहोचल्यावर सर्व विधी आनंदात पार पाडले. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा तिने व्हायरल केला. मात्र, सर्व विधी पार पडल्यानंतर विशाल न सांगताच घराबाहेर पडला, त्यानंतर रात्री उशीरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळविले.

दरम्यान, पोलिसांनी विशालचा फोटो कुटुंबियांकडून घेऊन त्याची शोधाशोध केली असता. विशालचा मृतदेह रेल्वे पटरीवर आढळून आला. विशालच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी निशाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अगदी चार दिवसांपुर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्याने अचानक आत्महत्या केल्याने कुटुंबियांवर संकटाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेमुळं संपुर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निशा आणि विशाल यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहे.

Title: newly love marriage couple suicide at up
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे