Video: लॉकदरम्यान फिरणाऱ्यांवर एपीआय सागर धुमाळ यांची कारवाई...

नवी मुंबई परिसरात लॉकडाऊन दरम्यान विनाकारण दुचाकी व चारचाकी घेऊन फिरणाऱ्यांना पोलिस प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईत कोरोना व्हायसमुळे लॉकडाऊन वाढवण्यात आहे. मात्र, काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शिवाय, त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आली आहे.

नवी मुंबई परिसरात लॉकडाऊन दरम्यान विनाकारण दुचाकी व चारचाकी घेऊन फिरणाऱ्यांना पोलिस प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. कलम 173 व 179च्या अनुषंगाने कारवाई करून दंड वसुली करण्यात आली आहे. नवी मुंबई कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा पाहता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात 19 तारखेपर्यंत डाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, तरीही काहीजण लॉक डाऊन गंभीरपणे घेत नसल्याने कोपर खैरणे परिसरात ही कारवाई केली असल्याचे कोपर खैरणे पोलिस ठाण्याचे एपीआय सागर धुमाळ यांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिकेमध्ये विषाणूबाधित क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पोलिसांनी नवी मुंबई पालिका हद्दीत 22 ठिकाणी तर पनवेल पालिका हद्दीत 17 ठिकाणी नाकाबंदी करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलिस काद्यानुसार कारवाया सुरू केल्या आहेत. तर कलम 188 नुसार 100, मास्क न लावणे व सामाजिक अंतर न पाळणारे 52, विनाकारण फिरणारे नागरिक 88, मॉर्निंग-इव्हनिंग वॉक करणारे नागरीक 61, सामाजिक अंतर न पाळता आस्थापना सुरु ठेवणारे 2, नेमुन दिलेल्या वेळेत आस्थापना बंद न करणारे 5, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणार17, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची जप्त करण्यात आलेली वाहने 94, अशा पद्धतीने कारवाई केली आहे. तसेच यातील सुमारे 200 लोकांची धरपकड देखील केली आहे.

Title: navi mumbai police action on lock down time travelling
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे