मुंबई पोलिसांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल...

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना त्याचा फटका बसला आहे. मात्र, मुंबई पोलिस नेहमीच वेगळ्या पद्धतीने नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसतात. मुंबई पोलिसांचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना त्याचा फटका बसला आहे. मात्र, मुंबई पोलिस नेहमीच वेगळ्या पद्धतीने नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसतात. मुंबई पोलिसांचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६६ हजारांच्या पार पोहोचली आहे. कित्येक जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. पण या महामारीच्या काळातही मुंबई पोलिस योद्ध्याप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करत असून, मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, काही नागरिक अद्यापही मास्क न लावताच घराबाहेर पडताना दिसतात. त्यामुळे अशा नागरिकांना आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी नेहमीप्रमाणेच हटके स्टाईलमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

कोरोना महामारीच्या संकटापासून बचाव करायचा असेल तर मास्क लावणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी थेट वडा पाव, भुर्जी पाव, खिमा पाव या खाद्यपदार्थांचा वापर केला आहे. या संबंधीचा फोटो मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.

काय आहे या ट्विटमध्ये:
वडा पाव, खिमा पाव, भुर्जी पाव हे मुंबईकरांचे आवडते पदार्थ आहेत. ज्याप्रमाणे या सर्व पदार्थांमध्ये 'पाव' महत्वाचा आहे त्याचप्रमाणे बाहेर जाताना 'मास्क' वापरणं महत्वाचं आहे असं मुंबई पोलिसांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Title: mumbai police telling importance mask example wada paav twit
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे