Video: जीवघेणा स्टंट करणाऱ्या युवकाला आपण पाहिले का?

मुंबईतील एका उंच इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

मुंबई: मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व स्टंटबाजी करणारे अनेकजण पाहायला मिळतात. पण, कांदिवली भागातील असाच एका जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उंच इमारतीच्या कठड्यावर तरुण जीवघेणा स्टंट करत असून, काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून पोलिस सदर युवकाचा शोध घेत आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघातात पोलिसाचा मृत्यू

मुंबईतील एका उंच इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. युवकासोबत हा स्टंट मोबाइलवर रेकॉर्ड करणाऱ्या इतर दोन तरुणांचाही पोलिस शोध घेत आहेत.

पोलिस कर्मचाऱ्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओत युवक इमारतीच्या २२व्या मजल्यावरील कठड्यावर बसून, एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. यानंतर तो तेथील अरुंद ठिकाणी उभे राहून हॅण्डस्टँड करताना दिसत आहे. स्टंटबाजी संपल्यानंतर एक गाणेदेखील बॅकग्राऊडला वाजत आहे. तो हे सर्व करत असताना त्याचे इतर दोन मित्र मोबाइलवर हा स्टंट रेकॉर्ड करत होते. यामधील एकजण मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतही आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कांदिवली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रवी अदाने यांनी ज्या इमारतीवर हा स्टंट करण्यात आला तिची ओळख पटली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

भीषण अपघातात सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

Title: mumbai kandivali building youth stunt video viral police sea
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे