जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणारे युवक ताब्यात

सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबईः कांदिवली भागात एका जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून पोलिस सदर युवकाचा शोध घेत होते. अखेर तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Video: जीवघेणा स्टंट करणाऱ्या युवकाला आपण पाहिले का?

सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी कांदिवलीतून ताब्यात घेतले आहे. नोमन डिसोजा असे या युवकाचे नाव आहे. नोमनसह हा व्हिडिओ बनवणाऱ्या त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात असलेल्या जय भारत या एसआरए इमारतीत गेल्या आठवड्यात हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी अधिक तपास करत ही कारवाई केली आहे.

जीव धोक्यात घालुन पोलिसकाकांनी वाचविले त्यांचे प्राण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 22 वयोगटातील ही तिन्ही मुले चित्रपट, टीव्ही मालिकेत, डान्स रिअॅलिटी शोमध्ये छोटी मोठी कामे करतात. त्याचसोबत हे तिघेही उत्तम डान्सर असून त्यांनी 'बागी' आणि 'सिंबा' सारख्या बॉलिवूडच्या सिनेमांतील काही गाण्यात एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम केलेले आहे.

नोमन हा एका उंच इमारतीच्या धोकादायक भागावर जाऊन स्टंटबाजी करत होता. तो दोन्ही हातांवर उभं राहून हॅडस्टर्न करत होता. तर दुसरे दोन युवक त्याचा व्हिडीओ तयार करत होते. या व्हिडीओमध्ये आजूबाजूचा परिसर देखील दाखवण्यात आला असून, नोमन अतिशय धोकादायक पध्दतीने स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेऊन ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीने शान वाढलीः गृहमंत्री

Title: mumbai kandivali building youth stunt video police arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे